श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी /नागपुर : 4 मे 2025
राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांमोर सामाजिक न्याय विभागाचे 700 कोटी अर्थमंत्री अजित पवारांनी अन्यत्र वळविल्याने सामाजिक न्याय विभागाचे खातेच बंद करा अशी व्यथा मांडली होती त्यांवर बरिएमं संस्थापिका तथा माजी राज्यमंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांची प्रतिक्रिया देतांना म्हटले कि अजित पवार नेहमी मागासवर्गीय समाजासोबत दुजाभाव करीत आलेत. ते नेहमी मागासवर्गीयांच्या उत्थानाच्या विरोधात राहिले असुन राज्याचे त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे 700 कोटी लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग केल्याची व्यथा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त करीत या सामाजिक न्याय विभागच बंद करा असा संताप व्यक्त केला हे अतिशय चिंतनीय असुन अशा प्रकारे सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र वळविणे हे गैरसंवेधानिक असल्याची टीका माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या माजी सदस्या अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी केली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिताक्काळ या गोष्टींची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाचा वळविलेला निधी तात्काळ सामाजिक न्याय विभागाला परत कसा देता येईल यांवर लक्ष्य केंद्रीय करावे अँड.सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, अजित पवार यांची भुमिका नेहमी मागासवर्गीयांच्या विरोधात राहिली आहे.त्यांनी विदर्भाच्या तुलनेत नेहमी पश्चिम महाराष्ट्रालाच झुकते माप दिले आहे. लाडकी बहिण योजना ही लोकप्रिय व महत्वकांक्षी योजना असुन या योजनेसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी महसुल, व सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना हजारो कोटींचे लोन सबसिडी कमी करुन लाडकी बहिण योजनेसाठी तरतुद करावी असेही त्या म्हणाल्या.
सामाजिक न्याय विभाग हा दलित मागासवर्गीय समाजाचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सबलीकरण करते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फेलोशिप च्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी देते अशातच सामाजिक न्याय विभागाचा शेकडो कोटी निधी अन्यत्र वळविणे हे दलित मागासवर्गीय विरोधी आहे . मागासवर्गीय समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये व अन्यत्र वर्ग केलेले शेकडो कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला कसे परत मिळवून देता येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केंद्रित करावे अशी सुचना अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी केली आहे.
