श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 1 नोव्हेंबर 2025
आंतरराष्ट्रीय बंधुत्व आणि जागतिक शांततेचे प्रतीक असलेल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 26 वा वर्धापन दिन सोहळा बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता भव्य आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि जपानमधील विख्यात बौद्ध धर्मगुरु व भिक्षू संघाची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात विशेष बुद्ध वंदना व धम्मदेशनाने होणार आहे
भारत-जपान बौद्ध धर्मगुरूंनी राहणार प्रमुख उपस्थिती. याप्रसंगी जपानमधील मिनोबसन कुंजी टेम्पलचे प्रमुख टेंगन हमाजिमा अध्यक्षस्थानी राहतील. त्यांच्यासोबत ग्योहो उचियामा, गोनशी वतनाबे, शिंग्यो इमाई, केन्सो होशिनो, क्योसेई कोमानो, ग्योकेन कूडो, कैओ सुजुकी या नामवंत बौद्ध भिक्षूंचीही उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात विविध देशांतील बौद्ध अनुयायी, धर्मगुरु, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून, आंतरराष्ट्रीय बंधुत्व, जागतिक शांतता आणि सामाजिक समता हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश असेल. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, धर्मप्रसार आणि मानवी एकतेचा भाव यांचा संगम दिसून येणार आहे. तीन दिवसीय कार्यक्रमांतर्गत 5 नोव्हेंबर रोजी सायं. 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत पावा म्युझिकल कार्यक्रम, 6 नोव्हेंबर रोजी सायं. 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत कौमी एकता मुशायरा, 7नोव्हेंबर रोजी सायं. 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्य आयोजनाच्या माध्यमातून बौद्ध धर्माची जागतिक स्तरावरची एकात्मता आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध अधिक दृढ होतील, असे ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख माजी राज्यमंत्री अँड.सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.










































