धनंजय मुंडेंना 5 लेकरं असतांना आमदारकीची उमेदवारी कशी मिळाली अजितदादा?
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
पुणे : 1 नोव्हेंबर 2025
आज पुण्यातील इंदापुर येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रपंच वाढवत असतांना मर्यादा ठेवा, तिसरं अपत्य असल्यास उमेदवारी मिळणार नाही असेही ते म्हणाले.त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते, पण त्यात काही अडचणी आल्या.
ते पुढे म्हणाले की, त्याच्यामधे निवडणुकीलाउभे राहण्याच्या करिता 2 पेक्षा 3 अपत्य असेल तर त्याला उभे राहता येणार नाही. त्याच्यामधे आम्ही वेगळा विचार करत होतो, ज्या सवलती सरकार देतं, त्या सर्व सवलती तुम्हाला पाहिजे असेल तर दोन पेक्षा तिसरं अपत्य असेल तर मिळणार नाही. जो मर्यादित ठेवल् त्याला मिळेल. ज्याला पलटण वाढवायची, वाढवं बाबा. आमचं काही म्हणणं नाही. कायकाय म्हणतात, त्याची क्रृपा..अरे तुझ्या आयला… त्याची क्रृपा आहे.. च्यायला तुझी क्रृपा आहे अन् त्याचं त्याचं काय सांगतो… असं कुठे होतेय.. त्याच्या क्रृपेवरच् पोरं झाली व्हयं… एक जण म्हणलंयं.. आंबा खाऊन पोरं होतय्ं.. पण काही खरं नाही… काय खाऊन काय व्हतय्.. हे मी सांगायची गरज नाही… बरेच लोकं बसलीत म्हणतील हे आज काय बडबडायला लागला…
अजितदादा तुम्हच्या पक्षाचे आ. धनंजय मुंडे यांना 5 मुले असतांना उमेदवारी दिली कशी?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांना फक्त 3 अपत्य होते हे सर्वांना माहित आहे परंतु त्यांचे झालेले दुसरे लग्न लपवून ठेवले. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा सोबत भानगड होती परिणामी त्यांनी त्यांचे सोबत ही लग्न केले होते आणि तिच्यापासून सुद्धा धनंजय मुंडे यांना 2 अपत्य असल्याची गोष्ट त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात लपविली निवडणुक आयोगापासुन त्यांनी सत्य जरी लपविले असले तयी मागील काही वर्षात करुणा शर्मा मुंडे यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा कोर्टातुन मिळाला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना सुद्धा ते कबुल करावे लागले की हो करुणा शर्मा ह्या त्यांच्या दुसरी पत्नी असुन तिच्या पासुन त्यांना 2 अपत्य आहेत. म्हणजे मुंडेंना एकुण 4 अपत्य झालीत. मग उपमुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमांतुन आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दमदाटी करुन परिवार छोटा असावा. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जरी हा कायदा महाराष्ट्र सरकारने घेतला असेल परंतु निवडणूक आयोगाने आ. धनंजय मुंडे यांना कधीच कारणे दाखवा नोटीस दिली नाही. त्यांची 4 अपत्य सिद्ध होऊनही त्यांची आमदारकी रद्द केली नाही. निवडणुक आयोग एरव्ही सामान्य ग्रा. पः., पं. स. जि. प. सदस्य यांचे सदस्यत्व 3 अपत्य असल्यास रद्द करते.मग हाच न्याय आमदार धनंजय मुंडे यांना का लागु केला नाही? नियम कायदे सर्वांना सारखे असले पाहिजे. आ. धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात. मग अजितदादा निवडणुक आयोगाला सांगुन धनंजय मुंडे यांची आमदारकी केव्हा रद्द करणार असे जनता विचारत आहे.
राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दाखल केलेले प्रतिज्ञापत्र सध्या चर्चेत आहे. या प्रतिज्ञापत्रामधील कुटुंबाचा तपशील हा लक्ष्य वेधून घेणारा ठरत आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी आपली पाच अपत्ये असल्याचे म्हटले आहे. वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदीश्री मुंडे, सिशिव मुंडे, शिवानी मुंडे अशी त्यांची नावे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 2019 साली धनंजय मुंडे यांनी परळीतून निवडणूक जिंकली होती. गेल्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ते 3 अपत्यांचे वडील असल्याचे म्हटले होते. निवडणुक आयोगाचा पक्षपाती निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. निवडणुक आयोग सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे खेळणे झाला आहे. महाराष्ट्र शासनाने निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी जे कडक नियम बनवले त्याच नियमाची अंमलबजावणी मुंडेच्या बाबतीत शिथील का गेली? निवडणुक आयैग हा धनंजय मुंडे यांचेवर एवढा मेहरबान का? हा जनतेचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विचारत आहे.













































