खरेच त्यांची प्रकृती बरी नाही की दुसरीच काही भानगड?
नागपुर: 31 आँक्टोबर 2025
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे संजय राऊत.. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून राऊत चर्चेचा केंद्रबिंदु बनले. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आजतागायत संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि राज्याच्या राजकारणात आरोपांचा धुरळा असं समीकरण बनले. मात्र हेच संजय राऊत आता पुढील काही दिवस सक्रीय राजकारणापासून 2 महिने दुर राहणार दूर राहणार आहेत.
राऊत यांनी नेमके काय सांगितले आहे?
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण शध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे राऊत यांनी सांगितले आहे.

2 दिवसांपुर्वी बावनकुळेंचे भ्रष्टाचार बाहेर काढतो असे म्हणाले होते राऊत आणि आज त्यांची तब्येत खराब?
नुकतेच 2 दिवसांपुर्वी एक पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले होतै की, 2 दिवस थांबा, बावनकुळेंचे भ्रष्टाचार बाहेर काढतो. फाईल तयार होत आहे आठवडाभर थांबा. बावनकुळेंची सर्व संपत्ती विकुन शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी होऊ शकत असेही शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले होते.
आज त्यांच्या तब्येतीची बातमी सोशल मीडिया मध्ये पसरली आणि खरंच राऊत यांच्या तब्येतीला नेमके काय झाले? खरेच त्यांची प्रक्रृती बरी नाही का? 2 महिने त्यांना गर्दीपासून व सक्रिय राजकारणापासून दुर राहण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे की डाँक्टरांनी तसा सल्ला दिला आहे की दुसरेच काहीतरी कारण तर नाही ना? की बावनकुळेंचे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून ही काही भानगड तर नाही ना? असे नानाविध प्रश्न आज राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यचीसे तब्येत चांगली नसेल तर त्यांनी खरोखरच तब्येतीची काळजी घेणे जरुरी आहे. पुढे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना आक्रमक भाषणे पण ठोकायची आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रक्रृती वर प्रश्न सुद्धा उचलु नये हे पण तितकेच खरे आहे. संजय राऊत प्रामाणिक प्रबळ आक्रामक विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना घाम फोडतात. ते बावनकुळेंना सहजासहजी हातमिळवणी करुच शकत नाहीत असेही त्यांचे समर्थक म्हणतात. पण राजकारणात केव्हा काय होईल? याचा नेम नाही. त्यामुळे संजय राऊत यांच्या तब्येतीवरुन तर राजकीय वर्तुळात तुर्तास तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.











































