धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व तयारीला आलाय वेग
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637662378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online
कामठी/नागपुर:26 सप्टेंबर 2025
69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीला वेग आला असुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख माजी राज्यमंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांच्या सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरू असून नगरपरिषद कामठीचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कामठी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या परिसरात सुरू असलेल्या संपूर्ण प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेतला.देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनी आंबेडकरी अनुयायी नागपुर येथील दिक्षाभुमी सोबत कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला सुध्दा भेट देत असतात. भेट देणा-या अनुयायांकरिता नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातुन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक 23/09/2025 रोजी ड्रॅगन पॅलेस परिसरात पाहणी दौरा केला. ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या सोबत बैठक घेऊन व्यवस्थेची माहिती दिली.

कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून खबरदारी

ड्रॅगन पॅलेस ला लाखोंच्या संख्येनी भेट देण्यासाठी येणा-या अनुयायांसोबत कोणतीही अप्रिय घटना होवू नये म्हणुन कायदा व सुव्यवस्था दृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्ताकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,गोपनीय विभागाचे अखिलेश ठाकुर यांनी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्यासोबत चर्चा करून ड्रॅगन पॅलेस परिसराची पाहणी केली. नगर परिषद कामठीच्या वतीने लाखोंच्या संख्येनी येणा-या अनुयायांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोर्टेबल टॉयलेट, मोबाईल टॉयलेट, बाथरूम, विद्युत व्यवस्था व जनरेटर, दोन चाकी व चार चाकी वाहणांकरिता पार्कींग तसेच बसेस पार्कींग व्यवस्था इत्यादी बाबत नगर परिषद चे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी याबाबत माहीती अँड. सुलेखाताई कुंभारे यांना दिली. ड्रॅगन पॅलेसकडे येणा-या अंडरपासच्या दोन्ही बाजुनी असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण व कच-याचे ढिगार काढण्याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त पूर्व तयारी कामावर लक्ष ठेवण्याकरिता नगर परिषद कामठीचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले, त्यामध्ये प्रदीप भोकरे, गौरव शर्मा, शुभम टाकभवरे, दीपक जैस्वाल, अकशिश मलिक यांना तात्पुर्ती विद्युत व्यवस्था व निवासी व्यवस्था, वीरेंद्र ढोके, विनोद मेहरोलिया यांना स्वच्छता व सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, प्रदीप तांबे, दर्शन गोंडाणे, राजेंद्र सोमकुवर यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जितेंद्र चवरे, ऋषभ जानेट यांना सी.सी.टी.वी. ची व्यवस्था, डॉ. शबनम खानुनी यांना आरोग्य केंद्राची व्यवस्था व सतीश उरकुडे, यांना अग्रिशमन व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी सुध्दा माहीती नगर परिषद कामठीचे मुख्याधिकारी भी विनोद जाधव यांनी दिली.
या वर्षी पावसाळा अद्याप कायम असून पावसाची शक्यता असल्यामुळे दिनांक 30/09/2025 ते 03/10/2025 दरम्यान आकस्मित पाऊस आल्यास आसपासच्या शाळा, कॉलेजेस, सभागृह इत्यादी ठिकाणी येणा-या अनुयायांकरिता पर्यायी व्यवस्था करण्याची सुचना अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी प्रशासकीय अधिका-यांना दिली.



































