श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई: 19 डिसेंबर 2025
कॉंग्रेस नेते खा.राहूल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारच्या जाहीर सभेत एक वक्तव्य केलं होतं..भाजपला ते वादग्रस्त वाटलं. त्याच्या मिर्च्या गुजरात मधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांना झोंबल्या.. त्यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला.. सुरत जिल्हा न्यायालयाने 23 मार्च 2023 रोजी राहूल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली..वरच्या कोर्टात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली..
मात्र अपिल मुदतीची पर्वा न करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने त्यांची खासदारकी ताबडतोब रद्द केली. त्यांना खासदारांसाठी असलेले घर सोडायला भाग पाडलं गेलं..
असंच एक प्रकरण परवा महाराष्ट्रातही घडलं..
बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली. हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा फक्त घेण्यात आला मात्र माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मुख्यमंत्री देवाभाऊं यांनी का रद्द केली नाही.? सत्ताधारी पक्षातील आमदार माणिकराव कोकाटे यांना देवाभाऊं का वाचवत आहेत? हा प्रश्न आता जनता विचारत आहे.
याआधी जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात नागपुरातील कांग्रेस चे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.. साडेबारा लाखांचा दंडही ठोठावला..झटपट त्यांच्यावरही कारवाई करत त्यांची आमदारकी काढून घेतली गेली..
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 ( Representation of the people act 1951)
नुसार लोकप्रतिनिधीला कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी साठी शिक्षा झाली तर त्याची खासदारकी अथवा आमदारकी
“शिक्षा झालेल्या दिनांकापासून” आपोआप रद्द होते.. वरील प्रकरणात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली गेली नाही हे आपण बघायला मिळत आहे.
मग माणिकराव कोकाटे यांना हाच नियम का लावला जात नाही? मुख्यमंत्री देवाभाऊं फडणवीस यांची काय मजबुरी असेल? .देवाभाऊं माणिकराव कोकाटे यांना का अटक करीत नाहीत. कोर्टाचा अटकेचा समंस घेऊन नाशिक चे पोलीस अधिकारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी परवा सायंकाळी गेले परंतु देवाभाऊंच्या राज्यात माणिकराव कोकाटे सारख्या गुन्हेगाराला राजकीय संरक्षण मिळत आहे?
माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून मुख्यमंत्री स्वेच्छा अधिकारातील सदनिका लाटल्या.. या प्रकरणात त्यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली..
कोर्टाचा निर्णय येताच “देवाभाऊंच्या राज्यात कोणालाही क्षमा केली जात नाही”अशा आशयाच्या पोस्ट भाजपच्या अंधभक्तांकडुन लगेच सोशल मीडिया मध्ये वायरल करण्यात आल्या… हे स्वाभाविक असलं तरी राजीनाम्याचं कौतूक करणारे, कोकाटेंची आमदारकी देवाभाऊंनी अजून काढून का घेतली नाही यावर सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकही शब्द बोलत नाहीत..
का?
राहूल गांधी किंवा सुनील केदार विरोधी पक्षाचे आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि माणिकराव कोकाटे सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय लावला जात असेल तर “कायदा सर्वांना समान असतो” या विधानाला काही अर्थ उरत नाही..
माणिकराव कोकाटेची आमदारकी ही तातडीने रद्द केली पाहिजे..
Indian National Congress – Maharashtra
Ncp Speaks Maharashtra
NCPA Mumbai
#DevendraFadnavis
#CMOMaharashtra
#BJP_Maharashtra


































