श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online
बुटीबोरी /नागपुर : 19 डिसेंबर 2025
आज शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 रोजी नागपूरजवळील बुटीबोरी एमआयडीसी (MIDC) परिसरात एका निर्माणाधीन कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली असुन अवादा कंपनीची निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळुन 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक कामगार जख्मी झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडुन मिळत आहे.
या घटनेची मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे
नेमकी घटना बुटीबोरी एमआयडीसीमधील ‘अवादा’ (Avaada) कंपनीच्या प्रकल्पस्थळी एका उंच टँक टॉवरचे (पाण्याची टाकी) बांधकाम सुरू असताना तो अचानक कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेत 3 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगारा उपसण्यासाठी जड यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
टाकीचे बांधकाम सुरू असताना तिचा समतोल बिघडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाकडून मृतांच्या आणि जखमींच्या ओळखीचे काम सुरू आहे.



































