श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
कामठी/नागपुर : 28 जुन 2025
राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे आज नागपुरच्या दौऱ्यावर होते. अत्यंत व्यस्त दौऱा असतांना ही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल कामठी येथील लोकप्रिय बुद्धिस्ट धार्मिक स्थळाला भेट दिली.



यावेळी ना. संजय शिरसाट यांनी मैत्री व शांती चे प्रतिक असलेल्या ड्रैगन पैलेस टेंपल येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे दर्शन घेतले. तसेच माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या द्वारा निर्मित वास्तुकलेचे त्यांनी कौतुक ही केले.यावेळी बोलताना ना. संजय शिरसाट म्हणाले की, “याठिकाणी आज भेट दिल्यावर कळाले की, मेडिटेशन काय असते, परिसर कसा स्वच्छ ठेवायचा हे सुलेखाताई यांचेकडून शिकायला मिळाले. अनेकवेळा आपण वास्तु उभ्या करतो पण त्याचे मेठेनंस कधी करत नाही अशा तक्रारी असतात. इथे आल्यावर मनःशांती लाभते हे वाखण्याजोगी आहे. ड्रॅगन पॅलेस टेंपल आयुष्यात पाहता येईल की नाही माहित नाही पण हा परिसर पाहण्याची व भेट देण्याची संधी सुलेखाताई यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्कात करतो. पुन्हा एकदा सांगतो की, या परिसरासारखा एवढा सुंदर व स्वच्छ परिसरात महाराष्ट्रात कुठेच नाही. सुलेखाताई यांना व उपासक उपासिका यांनाही शुभेच्छा देतो. उपासक उपासिका यांना सांगतो की ही वास्तु तुमची आहे तिचे जतन करा व त्याचबरोबर भगवान गौतम बुद्धांनी सांगितला उपदेश सर्वांनी अंगिकारावा”.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे हे देखील उपस्थित होते. ड्रॅगन पॅलेस टेंपल च्या संस्थापिका माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुष्पगुच्छ व भगवान बुद्धांची मुर्ती देऊन स्वागत केले. यावेळी बरिएमं चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



































