श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
कामठी: 28 जुन 2025
महाराष्ट्र शासनाचा नामांकित “फुले शाहू आंबेडकर पुरस्कार” कामठी येथील ओगावा सोसायटी ला नुकतात मुंबई येथील एका कार्यक्रमात मिळाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट याच्या प्रमुख उपस्थितीत हा बहुमोल पुरस्कार ओगावा सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी स्वीकारला.

फुले शाहू आंबेडकर चळवळीत सामाजिक व शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या ओगावा सोसायटी ला मिळालेला पुरस्कार नागपुरच्या इतिहासात हा मानाचा तुरा असल्याचे खापरखेडा येथील समाजसेवी दिलीप बंसोड, दिवाकर घेर, अनिल भोयर, गणेश लोणारे यांनी सांगितले. त्यांनी आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
