भाजप नेते किशोर चौधरीं वर आंबेडकरी समाजाची तीव्र नाराजी?
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
दहेगाव रं /नागपुर : 26 जुन 2025
नागपूर जिल्ह्यातील दहेगाव रं येथील वार्ड क्र. 1 भुखंड क्रमांक 281 वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरू आहे.येथे बऱ्याच वर्षांपासून बौद्ध नागरिकांकडुन पंचशील झेंडा उभारुन तेथे अनेक वर्षांपासून बौद्ध विहारात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.येथे विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी, व शासनाच्या विविध सामाजिक योजना व उपक्रम राबविण्यात येतात. सदर जागेची मोजणी व सीमांकन करन पटवारी रेकार्ड वर त्याची नोंद घ्यावी असे आदेश विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.01/10/2024 ला उप अधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, सावनेर यांना दिले होते. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्या भुखंड वरील बांधकामास अतिक्रमण अतिक्रमण दाखवुन ते हटविण्यासाठी दहेगाव रं ग्राम पंचायत ने तहसिलदार प्रशांत गोविंदपवार यांची दिशाभूल करुन अतिक्रमण हटविण्याचा आर्डर आणला असल्याचा आरोप आई रमाई झेंडा सुरक्षा समिती महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी केला.





सदर भुखंडावर शुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातुन सरु असलेल्या सामाजिक कार्यामुळे काही विरोधकांकडून जानुनबुजुन सामाजिक तेढ निर्माण होईल यासाठी वादविवाद सुरु केले. तसेच बौद्ध समाजातील महिला पुरुषांना जातीविषयक शिवीगाळ व येथे होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केल्यामुळे येथील बौद्ध बांधवांनी काही जनप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या विरोधात अँट्रासिटी अंतर्गत खापरखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करीत FIR सुद्धा दाखल केल्याची प्राथमिक सुत्रांकडुन माहिती मिळत आहे.
प्रापत माहितीनुसार दि. 4 जुन 2025 ला भुखंड क्रमांक 281 वरील अतिक्रमण हटविण्यासाठी दहेगाव रं. ग्रा पं. ने तातडीची मासिक बैठक घेऊन ठराव पारित केला. तहसीलदार सावनेर व मुख्यमंत्री कार्यालय नागपुर यांची दिशाभूल करुन सदर बांधकाम तोडण्याचा आर्डर आणला असुन दि. 27 जुन 2025 ला सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तोडण्याचा डाव येथील राजकारणी करीत असुन आम्ही त्यांना विरोध करु आणि अतिक्रमण हटविण्यासंबंधी कोर्टातुन स्टे आणु असे आंबेडकरी समाजाच्या इंदुबाई चौरे, करुणा चौरे यांनी सांगितले.
आंबेडकरी समाजाचे मधुकर गोंडाणे यांनी आरोप केला की भाजप नेते किशोर चौधरी यांनी तुमचे बौद्ध विहार पाडुन दाखवतो असे चैलेंज बौद्ध समाजाला केले होते, तुम्ही माझे काही करु शकत नाही अशा शब्दांत धमकी दिली असल्याचा आरोप मधुकर गोंडाणे यांनी केला. त्यामुळे या अतिक्रमण कारवाई विरोधात नागपुरातील सर्व सामाजिक संघठना व आंबेडकरी बांधवांना दहेगाव रं येथे गोळा होण्याची विनंती केली आहे. सध्या दहेगाव येथे तणावाची परिस्थिती ऊद्भवु शकते.आंबेडकरी समाज या ठिकाणी भाजफ नेते किशोर चौधरी यांचेविरोधात आक्रामक होत आहे. हा आपसी वाद सामंजस्याने सोडवण्याची गरज आहे.
विधानपरिषद सदस्य आ. चंद्रशेखर बावनकुळे व आ. क्रृपाल तुमाने यांच्या पत्राची अवहेलना?
मामागच्या वर्षी विधानपरिषद सदस्य आ. चंद्रशेखर बावनकुळे व आ. क्रृपाल तुथाने यांनी सदर भुखंडावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक बाचनालयाच्या जागेची मोजणी व सीमांकन करन पटवारी रेकार्ड वर त्याची नोंद घेण्याचे एसडीओ कार्यालय सावनेर व उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय सावनेर यांना दोन वेळा पत्र देऊनही त्यांच्या पत्राची अवहेलना करीत त्यांवर कोणतीही सूनावणी तहसीलदार सावनेर यांनी न घेता अचानक दहेगाव ग्रा पं. च्या मासिक ठरावाच्या अनुषंगाने सार्वजनिक वाचनालय तोडण्याचा आदेश काढल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महसुलमंत्री यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे की प्रशासकीय अधिकारी महसुलमंत्री यांना जुमानत नाहीत? कि हा सर्व राजकीय देखावा जनतेला दाखवला जात आहे ?
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाची एकीकडे अवहेलना होत आहे. सदर अतिक्रमण हटाओ कारवाई अतितात्काळ महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थांबवावी अशी मागणी मधुकर गोंडाणे व बौथ्द बांधवांनी केली आहे.
आम्ही स्थानिक भाजप नेते किशोर चौधरी यांच्याशी यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जानुन घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही लवकरच यासंबंधी त्यांची भुमिका व प्रतिक्रिया जानुन घेणार आहोत. दहेगाव रं. येथे त्यांच्या पत्नी सौ. अर्चना किशोर चौधरी ह्या सरपंच देखील आहेत.

