भाजपात बंडखोरीची शक्यता कमी – बावनकुळेंना विश्वास!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 10 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्रात महायुतीची चाचपणी अंतिम टप्प्यात असून महायुतीचाच मार्ग योग्य आहे .मात्र महायुती शक्य नसलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेताना मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला, रामटेकमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र लढतीची मागणी केल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की त्यांनाही आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात महायुतीबाबत प्रचंड उत्साह असून 51 टक्के मत मिळवून महायुती विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.,
तिकीट वाटप आणि स्थानिक निर्णयांसाठी सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीला देण्यात आले आहेत. महायुतीची चाचपणी सुरू असून 17 नोव्हेंबरपर्यंत त्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. वाटाघाटी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहेत. आमच्या पक्षात बंडखोरीची शक्यता कमी आहे. भाजपमध्ये शिस्त आहे आणि कार्यकर्त्यांना तिकीटासाठी योग्यवेळी मागणी करणे माहिती आहे. डबल इंजिन सरकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



































