भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गज्जुभाऊ यादव यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री बावनकुळेंच्या कोराडीत झाला पक्षप्रवेश
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी /नागपुर 8 नोव्हेंबर 2025 नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (महसूलमंत्री) , यांच्या उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात काल उबाठा व कांग्रेस च्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मनोहर पाठक, राजेंद्र शेंद्रे कन्हान भाजप शहराध्यक्ष महेंद्र साबळे यांच्या सोबत निस्वार्थपणे समाजकार्य क्षेत्रात कार्य करण्याच्या दृष्टीने कन्हान, पारशिवनी तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, तालुका प्रमुख निकुंज गराडे, पंकज प्रजापती, निकेश कुंभारे, रामप्रसाद कोकोड्डे, प्रफुल वासनिक, पंकज मलेवार, पारस नानवटकर तसेच कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ता शक्ती पात्रे, युवराज पात्रे, अशोक गायकवाड, सरिताताई पात्रे, रिताताई खडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला.


यावेळी भाजपचे रणवीर यादव, कामेश्वर शर्मा, आकाश वाढणकर, हरीश खंगारे, विक्रांत सोलंकी, विजय खडसे, उमेश पवनीकर, मनोज कुरडकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रामटेक विधानसभेत शिवसेना उबाठा पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. तर लोकसभेला कांग्रेसचे शामकुमार बर्वे निवडुन आल्यानंतर ही विकासनिधी न मिळणे स्थानिक पातळीवर बेरोजगारी, स्वयंरोजगार यांवर कोणतेच ठोस पावले उचलली जात नसल्याची नाराजी कांग्रेस कार्यकर्त्यांत असल्याने सत्तेसोबत जाण्याचा कांग्रेस कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला.



































