श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी /नागपुर : 28 आँक्टोबर 2025
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ग्रृहक्षेत्र असलेल्या कोराडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये सध्या दिवाळी निमित्त विविध पक्षांचे उमेदवारांनी स्वतःला भावी उमेदवार म्हणून राजकारणात धुमाकुळ घातला आहे.
कांग्रेसमधुन शितल कंभालेची उमेदवारी जाहीर करुन नानाभाऊ कंभालेची आघाडी, 2 नावे शर्यतीत

कांग्रेस चे कोराडी जिल्हा परिषद सर्कल चे माजी सदस्य ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ कंभाले यांनी 4 महिन्याआधीपासुन सर्वसाधारण सीट आल्यास ते स्वतः उमेदवार म्हणून उभे राहतील व ओबीसी महिला राखीव झाल्यास त्यांची भावसुन शितल राजेश कंभाले उभे राहतील अशी चर्चा आपल्या हितचिंतकांशी बोलताना केली होती. सध्या कोराडी जिल्हा परिषद सर्कल हे ओबीसी महिला राखीव झाल्याने नानाभाऊ कंभाले यांनी दिवाळीच्या निमित्ताने कांग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणून शुभेच्छा बैनरमधुन जनतेत संदेश दिला तर आणि त्यांचे संपुर्ण सर्कल मधील विविध गावात चर्चेचे वातावरण निर्माण केले. तर कांग्रेस पक्षाकडून त्यांच्या समर्थक राहिलेल्या कामठी पं. स. च्या उपसभापती केशरताई बेलेकर यांची सुद्धा लढण्याची इच्छा दिसत आहे. निवडणूक लढण्यासाठी आवश्यक मनी पाँवर आणि मैन पावर मध्ये नानाभाऊ कंभाले पुढे आहेत आणि त्यांच्या भावसुनेशिवाय दुसरा सक्षम उमेदवार कोणीच नाही असे कंभाले समर्थक यांना वाटते. कांग्रेस चे स्थानिक नेते वासुदेव बेलेकर यांना वाटते कि त्यांच्या पत्नी खऱ्या अर्थाने दावेदार असुन त्यांना पक्षश्रेष्ठींनी संधी द्यावी. पक्षनेत्यांकडे त्यांनी कोराडी जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मैन पावर व मनी पावर मध्ये बेलेकर परिवार मागे असले तरी इच्छुक उमेदवार म्हणून सौ. केशरताई वासुदेव बेलेकर ह्या ही उमेदवारी च्या शर्यतीत आहेत. दिल्लीतून उमेदवारी खेचुन आणण्यात कंभालेंचा हात कुणी धरु शकत नाही असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. कदाचित नागपूर जिल्हा परिषद च्या उमेदवारी जाहीर करतांना पहिले नाव त्यांच्या भावसुन शितल राजेश कंभाले यांचेच असेल असे त्यांचे समर्थक म्हणतात. कांग्रेस कडुन उमेदवारी घोषित करुन सध्या तरी शितल राजेश कंभालेंनी भाजपवर आघाडी घेतलेली दिसत आहे. नानाभाऊ कंभाले यांची लोधी, बौद्ध समाजाच्या मतांवर पकड आहे. आणि कुणबी समाजातही ते लोकप्रिय आहेत. म्रृदु स्वभाव, तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असणारे नानाभाऊ कंभालेची तशी सर्व समाजातील मतदारांवर घट्ट पकड आहे आणि निवडणुक जिंकण्याचे कसब पण त्यांच्यात आहे असेही वेळोवेळी त्यांनी दाखवुन दिले.
भाजप मध्ये एका सीट साठी 3 दावेदार!

कोराडी जिल्हा परिषद सर्कल सीट ओबीसी महिला साठी राखीव झाल्याने भाजप कडुन 3 नावे सध्या चर्चेत आहेत. भाजप कडुन माजी ग्रा पं. सदस्या राहिलेल्या मायाताई यशोधन भोस्कर यांचे नाव आघाडीवर आहे. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांचे खास मित्र असलेले कुणाल भोस्कर यांच्या मायाताई भोस्कर ह्या आई आहेत.कोराडी सर्कलमध्ये कुणबी समाज बहुसंख्येने आहे. कोराडी जिल्हा परिषद सर्कल मधील कोराडी सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असल्याने ही सीट कोराडी नविन पुनर्वसन मध्ये द्यावी असा कुणाल भोस्कर मित्र परिवाराचा आग्रह आहे. राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की मायाताई यशोधन भोस्कर यांच्या नावावर खुद्द महसुलमंत्री यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे व मुलगा संकेत सकारात्मक आहेत तर कोराडी च्या माजी उपसरपंच राहिलेल्या सौ. अर्चना संदीप दिवाने यांचेही भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून चर्चित नाव पुर्ण सर्कल मध्ये आहे. ग्रा पं. चे सदस्य व उपसरपंच राहणाऱ्या सौ. अर्चना संदीप दिवाने ह्या लोधी, वानी, कुणबी समाजात कोराडी सर्कल चा भाजपचा नविन चेहरा आहे. त्यांच्या मदतीला कोराडी पांजरा येथील भाजप चे ग्रा पं. सदस्य उमेश निमोने ताकदीने भिडलेले बघायला मिळत आहेत. त्यांचे दिवाळी निमित्त लागलेले मोठे मोठे बैनर लक्षवेधी ठरत आहेत. तर कोराडी सर्कल साठी पं. स. च्या माजी सदस्य व बाभुळखेडा च्या माजी सरपंच सौ. सविता रामचंद्र जिचकार यांचेही भाजपकडुन सर्व प्रश्नांचे एकच उत्तर भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणुन बैनरबाजी व सोशल मीडियातून महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपुढे त्या स्वतःला रिप्रेजेंट करीत आहेत. त्यांचे निवास बाभुळखेडा गट ग्रापं. मध्ये असुन कुणबी समाजाकडून दोन नंबरच्या इच्छुक उमेदवार आहेत.
भाजप चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे 3 उमेदवारांची नावे पुढे आल्याने उमेदवार नेमकी कुणाला जाहीर करावी असा पेच निर्माण झाला आहे. दिवाळी होऊनही आज पक्षाकडून अद्याप कोराडी सर्कल करिता उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यात उमेदवाराच्या नावाचा गोंधळ उडाला आहे. नाव जाहीर व्हायला भाजप कडुन उशीर.होतोय परंतु इच्छुक उमेदवार यांचा अजुनही पक्षश्रेष्ठी व नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास आहे की उमेदवारी त्यांनाच मिळेल एका सीट साठी 3 उमेदवार असल्याने मनीपावर व मैनपावर मध्ये कुणाल भोस्कर ह्या इतर उमेदवारापेक्षा पुढे आहेत. तर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या तीन उमेदवारांपैकी एकालाच फायनल करतात कि एखादे दुसरे नविन नाव पुढे आणुन जाहीर करतात याकडे आता भाजप समर्थकांचे लक्ष लागले आहे. सातत्याने 10 वर्षापासून होत असलेला पराभव बावनकुळेंना यंदा विजयात परिवर्तित करायचा आहे.मात्र उमेदवारी निश्चित करतांना कोराडी चे लोकप्रिय युवा सरपंच नरेंद्र धानोले यांची भुमिका उमेदवारी निश्चित करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कोराडी जिल्हा परिषद भाजप च्या उमेदवारांच्या नावाचा संस्पेंस लवकरच दुर होईल हे मात्र नक्की.







































