महसुल विभागाच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महसुलमंत्री बावनकुळे नरमले
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मुंबई :18 डिसेंबर 2025
नागपूर अधिवेशनादरम्यान महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसुल विभागाच्या 10 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी यांच्या तडकाफडकी निलंबनाची घोषणा केल्यानंतर महसुल संघठनाना महसुलमंत्री बावनकुळेंच्या या तुघलकी फर्मानाविरोधात आक्रमक होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी बावनकुळेंना आवर घालण्याची मागणी केली होती. तसेच कोणतीही चौकशी न करता अधिकाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई तसेच बैठकीत अधिकाऱ्यांना अरे-तुरे सारखी भाषा वापरणे याविरोधात महसुल विभागाच्या विविध संघठना आक्रमक झाल्या व 19 डिसेंबर पासुन महसुलमंत्री विरोधात कामबंद आदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अचानक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नरमले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आपले स्पष्टीकरण सादर केल्यावर निलंबन मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अशी भूमिका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली. या पार्श्वभूमीवर सर्व संघटना आपले आंदोलन मागे घेतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे व्यक्त केला.


मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात आज राज्यातील विविध महसूल संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत एकूण 13 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ या मुख्य महासंघाशी जोडलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघ (नागपूर-2 ), विदर्भ (राजस्व निरीक्षक) मंडळ अधिकारी संघ, नागपूर, विदर्भ कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चुकीच्या कामाला माफी नाही-बावनकुळे
बावनकुळे म्हणाले की, “ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे, त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, नैसर्गिक न्यायानुसार त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. पुढील तीन दिवसांत त्यांनी आपले स्पष्टीकरण द्यावे, त्यावर आधारित अहवाल तयार करून पुढील निर्णय घेतला जाईल. अनावधानाने झालेल्या चुकीला एकवेळ माफ करता येईल. पण जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी मिळणार नाही.”असेही बावनकुळेंनी ठणकावले आहे.




































