श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
हिंगोली :18 डिसेंबर 2025
सध्या कांग्रेस चे मोठमोठे दिग्गज कांग्रेस सोडुन भाजप मध्ये जात आहेत त्यामुळे कांग्रेसला मोठी गळती लागली आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधकांच्या महाविकास आघाडीला विविध जिल्ह्यांमध्ये धक्के बसत आहेत. अशातच हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसकडून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

कोण आहेत प्रज्ञा सातव?
आ.प्रज्ञाताई सातव ह्या हिंगोली चे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे घराणे म्हणून सातव घराण्याची ओळख आहे. विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या डॉ.प्रज्ञाताई सातव ह्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार आहेत.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातव या नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपासून त्या भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज गुरुवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होईल. या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद काग्रेस ला भेटु नये यासाठीच भाजपची खास रणनीती?
विधानपरिषदेत कांग्रेसचे 8 सदस्य आमदार आहेत विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी 8 आमदार असावे अशी माहिती असल्याने भाजपने बेत आखुन कांग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना हेरले व त्यांना भाजप च्या गळाला लावले. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे कांग्रेसचे विधानपरिषदेत फक्त 7 आमदार शिल्लक राहिले. त्यामुळे आता कांग्रेसला विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते पद भेटणे कठीण होऊ शकते. परंतु ऐन कांग्रेसच्या कठीण संघर्षाच्या दिवसात निष्ठावान समजल्या जाणाऱ्या प्रज्ञा सातव यांची काय मजबुरी आहे की त्यांना भाजप मध्ये जावे लागत आहे. याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. एक मात्र म्हणावे लागेल की आता भाजप डिफ्रंट राहिली नाही. महाराष्ट्र कांग्रेस मुक्त करण्याच्या नादात कांग्रेस युक्त भाजप पक्ष बनत चालला आहे. कांग्रेसच्या नेत्यांची भाजपात गर्दी झाल्याने भाजपमधील जुन्या नेत्यांची /कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ नये.



































