श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services
नागपुर : 9 जुन 2025
आज कामठी विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे पराभुत उमेदवार सुरेश भोयर यांनी नागपुरातील पत्रपरिषदेत सांगितले की, कामठी मतदारसंघाबद्दल कांग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात सत्य आहे. विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली त्यावेळी कामठी-मौदा मतदारसंघात 35 हजार मतदार वाढले होते. यात 12 हजार मतदार शेवटच्या तीन दिवसात वाढल्याचा आरोप विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी निवडणूक आयोगाच्या बोगस कामकाजावर आरोप केले.

ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी 29 ऑक्टोबर 2024 मध्ये मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात 23 हजार मतदार वाढले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानाच्या तीन दिवसा अगोदर पर्यंत 12 हजार मतदार ऑनलाइन नोंदणी करून वाढलेले आहे. हे मतदार कोणत्या कागदपत्रांच्या आधारे वाढले? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केली आहे.
केवळ आयडी प्रूफच्या भरोशावर छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील परप्रांतीय ईट भट्ट्यांवर काम करणाऱ्या नागरिकांचे नाव ऑनलाईन मतदार यादी समाविष्ट कसे झाले, असा गंभीर आरोप पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला.
आज झालेल्या पत्रपरिषदेत सुरेश भोयर यांनी कामठी विधानसभेतील भाजप चे विजयी उमेदवार यांच्या विजयावर अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला आहे.
