श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
सावनेर /नागपुर :4 जुलै 2025
पंचायत समिती सावनेर अंतर्गत जिल्हा परिषद च्या शाळा दिनांक 23 जून 2025 पासून सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून ग्रामीण भागातील गरिबांचे मुलं शिक्षण घेत आहेत.

शाळा सुरू होऊन आता दोन आठवडे पूर्ण झाली आहेत. राहुल तिवारी माजी उपसभापती सावनेर पं. स. यांनी आरोप केला की, मी घेतलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील 75 % शाळांमधील विद्यार्थांना पूर्ण पुस्तके प्राप्त झालेली नाही नसुन काही विद्यार्थ्याना पूर्ण पुस्तके तर काहींना एक दोन विषयाची पुस्तके मिळालेली आहे. हे अत्यंत गंभीर असून आजवर पुस्तके विद्यार्थ्याना न मिळणे ही प्रशासनाची अक्षम्य चूक आहे. पुस्तकाविना विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा, हे प्रशासनाने समजावून सांगणे महत्वाचे आहे. एकच वेळी इतक्या शाळांमध्ये पुस्तके नसणे म्हणजे पुस्तके गेली कुठे? हा फार मोठा प्रश्न नागपुर जिल्हा परिषद प्रशासनास राहुल तिवारी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सोबतच अनेक शाळांमध्ये पुस्तके तर नाहीच आहे पण शिकवायला शिक्षक सुद्धा नाही आहे. पुस्तके आणि शिक्षक नसताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान न भरून निघणारे आहे. मी ज्या गावात राहतो त्या चनकापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर येथे मागील वर्षभरापासून 2 शिक्षक नाहीत. वारंवार तक्रार करूनही आतापर्यंत आपण शिक्षकाची व्यवस्था केलेली नाही आहे.
याशिवाय अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा नाही आहे . शौचालय सुद्धा नाही आहेत. याबाबत सुद्धा राहुल तिवारी यांनी प्रशासनाला वेळोवेळी अवगत केलेले आहे.
पुढील आठवड्यात ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही तिथे शिक्षक, पुस्तके पुरवावीत. जिथे भौतिक सुविधा नाही त्या देवून या परिस्थितीत सुधारणा करावी नाहीतर तीव्र आंदोलन करण्याशिवाय मला पर्याय राहणार नाही. याला आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा इशारा माजी राहुल तिवारी, पं. स. उपसभापती सावनेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नागपुर जिला परिषद यांना एका निवेदनाद्वारे दिला.
