श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378/9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मौदा/नागपुर : 1 नोव्हेंबर 2025
विलासराव देशमुख आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲन्ड रिसर्च सेंटर श्रीमती राजकमल तिडके मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मौदा तर्फे मोफत रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिर नागपूर जिल्ह्यातील मौदा शहर येथे घेण्यात आले.
या शिबिरात स्त्री रोग, बालकांचे विकार, पंचकर्म इत्यादी सामान्य रोग संबंधी तपासणी व उपचार करण्यात आले. गावातील लोकांनी या शिबिरात येवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या शिबिरात मोफत रोगतपासणी सोबतच मोफत औषधी देण्यात आली.
यया शिबिराचे आयोजन श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्थेचे सचिव प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके यांच्या मार्गदर्शनात व सौ. प्रिया तिडके यांच्या उपस्थित घेण्यात आले.

मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. प्रशांत डाखोळे , डॉ. सोनिया म्हात्रे, डॉ. स्वाती बजाज, डॉ. अर्चना पाटील, डॉ. अमित राठोड, डॉ. अभिजित कावळे, डॉ. चेतना काळबांडे, डॉ. मानसी जयस्वाल, डॉ. मृणाली येरणे या सर्व डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.
सामाजिक कार्यकर्ते राजेश निनावे, विलास बावणे, धर्मराज निमजे, दिलीप शिरसाम,सौ.कल्पना मानकर, सौ.रेखा कोहाड, आशा वडवाले उपस्थित होते.
या शिबिरात कोमल पत्रे, निकिता येरणे, स्मिता वाडीभस्मे , कोमल हरोडे, पूजा राठी, ओंकार वंजारी, आकांक्षा जंजाळे, आस्था हटवार, राजेश्री कुंभालकर , प्रेरणा खेडकर, करिश्मा बोरीकर, गजानन तिडके यांच्या परिश्रमाने हे शिबिर पार पडले.











































