श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
रामटेक : 5 मे 2025
दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.



आपणच आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वाटा आपल्या हातात घ्या असे ठणकावून सांगणाऱ्या , दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक समाजसेविका कामिनी हटवार यांचा वाढदिवस म्हणुन दिव्यनारी सोशल फाऊंडेशन च्या वतीने विविध माध्यमातुन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन रामटेक येथे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना वाढदिवसानिमित्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे आरोग्य करिता डॉ. वाघमारे, व डॉ.रवींद्र पांडे यांचे उपस्थितीत सरकारी दवाखाना येथे बिस्किट व फळ वाटप दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष, संस्थापक कामिनी हटवार व सदस्य रोशनी हटवार, सीताबाई शाहू, सपना बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी रामटेक तालुका अध्यक्ष मनीष दादा खोब्रागडे, आदित्य खंडारकर, अमर सहारे व डॉक्टर स्टॉप उपस्थित होते.
