श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
नागपूर : 4 मे 2025
कांग्रेस चे जेष्ठ नेता माजी मंत्री सुनील केदार यांचे अत्यंत निकटवर्तीय खंदे समर्थक असलेले नागपूर जिल्हा परिषद चे माजी सदस्य दुधराम सव्वालाखे यांचा नुकताच दोन दिवसापुर्वी भाजप मध्ये प्रवेश झाला. कांग्रेसचे माजी आमदार यादवराव भोयर यांच्या पुर्णाक्रृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी राज्यातील मोठ्यचा कांग्रेस नेत्यांचा जंगी कार्यक्रम कामठी येथे आयोजित करण्यात आला होता. अशातच कामठीत कांग्रेस पुन्हा मजबुत होऊ नये यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कांग्रेस नेता सुनील केदार यांना झटका देण्याच्या उद्देशाने केदार समर्थक दोन – तीन समर्थकांना भाजपात आणण्याचा विशेष प्रयत्न केला. परंतु केदार समर्थक दुधराम सव्वालाखे सारख्या भ्रष्टाचाराचे 2 डजनभर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असणाऱ्या कांग्रेस नेत्याला भाजपात आणुन बावनकुळे यांनी आपल्र्याच पायावर धोंडा मारून घेतला असेही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली. आता भाजपात गेलेल्त दुधराम सव्वालाखे यांच्याबद्दल तरहा च्या खमंग चर्चा ऐकायला मिळत आहेत. अचानक दुधराम सव्वालाखे यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला? केदारांना सोडुन ते भाजप मध्ये जाण्याचे कारण काय यांबद्दल राजकीय गोटातून वेगळीच चर्चा ऐकण्यात येत आहे.
रामटेक विधानसभेतील नगरधन भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कल ची निवडणुक जाहीर होताच एकेकाळी उपनिबंधक पदावर राहिलेले शासकीय अधिकारी दुधराम सव्वालाखे यांनी निवडणुकीपुर्व भरलेले नामांकन पत्र बघुन अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण त्यात त्यांचेकडे 200 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात होती. तत्कालिन कांग्रेस नेता गज्जु यादव यांनी कांग्रेस पक्षाची उमेदवारी दुधराम सव्वालाखे यांना मिळवुन दिली व त्यांना निवडुन आणले होते. परंतु राज्यात महाविकास आघाडी चे सरकार बनले व सुनील केदार मत्री बनताच सव्वालाखे यांनी गज्जु यादव यांची साथ सोडत केदार गटात उडी मारली कांग्रेस नेता सुनील केदार यांचा आशीर्वाद घेऊन दुधराम सव्वालाखे कांग्रेसमध्ये आपली पकड मजबूत करीत राहिले त्यानंतर त्यांना उपाध्यक्ष पदाची /सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल अशी अपेक्षा होती. परंतु सव्वालाखे या पदापसुन वंचित राहिले.
त्यानंतर सव्वालाखे यांनी रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल यांचेसोबत मिळुन बाजार समिती निवडणुकीत पैनल उभे केले त्यात केदार गटाच्या या पैनलचा दारुण पराभव झाला. त्याचवेळी कांग्रेसचे गज्जु यादव यांनी केदारांच्या गटबाजीचा कंटाळून कांग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपाचा झेंडा आपल्या हाती घेतला.नुकत्याच झालेल्या रामटेक विधानसभा निवडणुकीत कांग्रेस कडुन दुधराम सव्वालाखे यांना आमदारकीची उमेदवारी हवी होती असेही बोलले जाते. परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीतीलील शिवसेना पक्षाला ही सीट सोडली गेली तरीही सुनील केदार यांनी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या अपक्ष उमेदवारीला जोरदार समर्थन करीत पुर्ण ताकद राजेंद्र मुळक यांच्यासाठी लावली. दुधराम सव्वालाखे यांचा हिसमोड झाला. परंतु राज्यात कांग्रेस पक्षाचे समोर सरकार येईल कि नाही? आपण कमावलेल्या 200 करोड रुपयांच्या संपत्तीची ईडी चौकशी झाली तर कसे होईल या चिंतेतून दुधराम सव्वालाखे यांनी अचानक केदारांची साथ सोडण्याचा निर्णय घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नेत्रृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त करीत भाजप च्या पक्षमेळाव्यात त्यांनी भाजपात नागपूर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ते ईडी चा ससेमिरा टाळण्यासाठी काही दिवसांपासून भाजपात जाणार अशा चर्चा होत्या. त्यांवर शेवटी सव्वालाखे यांनीच शिक्कामोर्तब केले.
कोण आहेत दुधराम सव्वालाखे?
विश्वस्नीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार नागपुर जिल्हा परिषद चे माजी सदस्य असलेले केदारांचे कट्टर समर्थक दुधराम सव्वालाखे हे उपनिबंधक पदावर असतांना त्यांनी अनेक जमिनीचे व्यवहार नियमबाह्यरित्या करीत करोडो रूपयांची संपत्ती कमावण्याच्या तक्रारी ईडी व सीबीआय कडे करण्यात आल्याची माहिती होती.
दुधराम सव्वालाखे यांचेवर आर्थिक फसवणुकीचे जवळपास दोन डजनभर गुन्हे दाखल झाले. बैंकात तारण (गिरवी) ठेवलेल्या शेत्या पत्नीच्या संगनमताने परस्पर विक्री केल्याचा ही गुन्हा काही महिन्यापुर्वी विविध पोलीस स्टेशन ला दाखल झाले होते.
दुधराम सव्वालाखे यांच्याकडे 200 कोटींच्या प्रापर्टी चे खरे मालक कोण?
दुधराम सव्वालाखे यांच्याकडे जवळपास 200 करोड रुपयांपेक्षा जास्त प्रापर्टहे असल्याची तक्रार ईडी व सीबीआय कडे याआधी झाली होती. परंतु त्यांच्या कडे असलेली प्रापर्टी नेमकी त्यांचीच आहे की अजुन कोणाची याबद्दल आता राजकीय वर्तुळात रंगली खमंग चर्चा. असेही बोलले जात आहे नागपुरातील एका वजनदार आमदारांच्या सासरे हे दुधराम सव्वालाखे यांच्ते प्रापर्वाटीत संयुक्तिक हिस्सेदार सातबाऱ्यांवर आहेत.सव्वालाखेंच्या प्रापर्ट्या चा खरा मालक कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. आता दुधराम सव्वालाखे यांचा भाजप मध्ये प्रवेश करुन भाजपच्या वाँशिंगमध्ये बावनकुळे यांनी त्यांना क्लीन केले आहे का? आता ईडीकडे सव्वालाखे यांची झालेली तक्रार कचऱ्याच्या डब्यात जाणार काय? ईडी सीबीआई आता ईमानदारीने सव्वालाखे यांच्या प्रापर्टीचे चौकशी करणार काय? सव्वालाखे कडे एवढी प्रापर्टी आली कुठुन? कुठल्या वजनदार आमदाराने कमावलेली अवैध संपत्ती दुधराम सव्वालाखे सारख्या अजुन कुणाकुणाच्या नावावर आहे याची सखोल निष्पक्ष चौकशी ईडी व सीबीआय करणार काय? की आता सव्वालाखे ची चौकशी च थांबणार? शेवटी विरोधक म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचारी नेते भाजपात येताच भाजपचे नेते डिटर्जंट पावडर ने त्यांना घासून स्वच्छ करणार? राजकीय वर्तुळात असेही बोलले जात आहे कि एका राजकीय पक्षाच्या आमदारांनी आपला ब्लैक मनी व्हाईट करण्याच्या उद्देशातुन रामटेक मधील काही राजकीय कार्यकर्ता यांचे नावाने प्रापर्ट्या /शेत्या खरेदी केल्यात. असेही बोलले जात आहे की दुधराम सव्वालाखे यांचे कुटुंबियाकडे असलेल्या प्रापर्ट्या च्या सातबाऱ्यांवर त्या कथित आमदारांच्या सासऱ्यांचे ही संयुक्तिक नाव आहे. त्यामुळे दुधराम सव्वालाखे कडची 200 करोड रुपयांची प्रापर्टी ही त्यांची आहे की?……. त्या कथित आमदारांच्या नातेवाईकांच्या नावे हे याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सव्वालाखे यांना ईडीकडुन काही दिवसापुर्वी नोटीस इश्यु झाली होती काय? त्यांच्यामागे चौकशी चा ससेमिरा लागला होता हे खरे आहे का? त्यांनी भाजपात जाऊन स्वतःला निर्मळ व सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे का? असेही आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजपाला भ्रष्टाचार फसवणुकीचे आरोप असणाऱ्यांची का नामुष्की ओढवली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर?
ज्या व्यक्तीच्या विरोधात 2 डजनभर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अशा दागदार दुधराम सव्वालाखे यांना भाजपमध्ये प्रवेश देतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्मचिंतन का केले नाही? अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना भाजपात घेऊन भाजप मजबुत होत आहे की खिळखिळी? याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अँक्शनमोड मध्ये यायची नितांत गरज आहे. महाराष्ट्र भाजप पुढे नेमकी काय मजबुरी आली आहे कि त्यांना इतर राजकीय पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात आणण्याची गरज का पडली बावनकुळे यांना? भाजपात जर अशाच पद्धतीने कांग्रेस राष्ट्रवादी च्या नेत्यांचा प्रवेश होऊ लागला तर भाजपात एवढी गर्दी होईल आणि वर्षानुवर्ष भाजपासाठी सतरंजी उचलणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचे काय होईल? त्यांचे भविष्य काय?. भाजपात आलेल्या बाहेरच्या नेत्यांमुळे भाजप खरोखर मजबुत होत आहे कि आतुन खिळखिळी होत आहे. एक दिवस भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा उद्रेक येत्या काळात आपणास बघायला ही मिळु शकतो. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये प्रत्येकानं संधी भेटणे शक्यच नाही. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपात वाढवेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे आता तारेवरची कसरत ठरु नये म्हणजे कमावले असेच म्हणावे लागेल.
