श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
पारशिवनी /रामटेक : 14 जुलै 2025
पारशिवनी तालुक्यातील रविंद्र राऊत यांचे दोन्ही हात विजेचा तीव्र शॉक बसून कोपरापासून तुटले होते. ही अत्यंत वेदनादायक घटना होती. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सिंथेटिक हात (मायोइलेक्ट्रिक आर्टिफिशियल आर्म्स) प्रदान करण्यात आले.
हे सिंथेटिक हात त्यांच्या खांद्यातील व हातातील उरलेल्या स्नायूंच्या हालचाली (myoelectric signals) सेन्स करून कार्य करतात. हाताच्या पृष्ठभागावर लावलेल्या अत्यंत संवेदनक्षम इलेक्ट्रोड्समुळे मेंदूने दिलेले हालचालीचे संकेत हातात रूपांतरित होतात, आणि त्यामुळे ते हात उचलणे, पकडणे, मोकळे करणे अशा मूलभूत हालचाली शक्य होतात.
आज हे कृत्रिम हात यशस्वीपणे जोडण्यात आले. या प्रसंगी रविंद्र राऊत यांनी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती होती. त्यांनी मनापासून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आभार व्यक्त करत ही मदत त्यांच्यासाठी नवजीवन देणारी ठरल्याचे सांगितले.
” दिव्यांग बांधवांचे आयुष्य अधिक सुसह्य व सन्मानपूर्वक होण्यासाठी मी केवळ रस्त्यावर नव्हे, तर विधानमंडळातही सातत्याने आवाज उठवत आलो आहे. दिव्यांग कल्याणासाठी ही लढाई सुरूच राहणार आहे.” असे यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपले विचार व्यक्त केले.
