श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
नवी दिल्ली : 7 मे 2025 एकीकडे 2 दिवसापुर्वी भारत देशात माँक ड्रील करण्याचे केंद्र सरकारने विविध राज्यांना आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य केवळ माँक ड्रील च करणार पाकिस्तान वर हल्ला होईल अशी कुणालाच कल्पना नसतांना आज पहाटे मध्यरात्री भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर हल्ला केल्याची सुत्रांकडुन माहिती पुढे येत आहे.
. बुधवारी(6 मे 2025) मध्यरात्रीच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ही एअर स्ट्राईक यशस्वी केलं. दरम्यान ही 9 ठिकाणं नेमकी कोणती हे जाणून घेऊया.
मध्यरात्री 1.28 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.51 वाजता मिशन पूर्ण केले.









केवळ 23 मिनिटांत 9 हवाई हल्ले, जैश चे 50 हुन अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती
केवळ 23 मिनिटांत खेळ खल्लास मध्यरात्री 1.28 वाजता भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसले, 1.51 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती
भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. पाकिस्तानात भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
- बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर - मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर - सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर - गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी - बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर - कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते. - बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर - सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर - महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर
‘ऑपरेशन सिंदूर’ची वैशिष्ट्ये- - पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
- भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
- पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
- दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
- ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
- भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
- आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र–
- पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर
- राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र
- अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र
- 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता
- 1 हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल करतं मारा
- शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हल्ला यशस्वी
