श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपुर : 29 आँक्टोबर 2025.
माजी मंत्री बच्चु कडु यांचा शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी सुरु असलेल्या महाएल्गार मोर्चात राज्य सरकारच्या वतीने आंदोलनस्थळी सरकारचे राज्यमंत्रीद्वय ना. अँड. आशिष जयस्वाल व ना. पंकज भोयर हे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले होते.
बच्चू कडू, राजू शेट्टी, कॉ. अजित नवले, महादेव जानकर आणि आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची भर पावसात चर्चा सुरु होती.

बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं की आम्ही शांत बसलो की सरकार शांत होतंय. आम्ही जेलभरो करायला लागलो की तुम्ही लगेच आलात. आम्ही चार वाजता तुम्ही येणार यासाठी वाट पाहिली. सहा वाजता कोर्टाचा आदेश आला तुम्ही यायला हवं होतं, आम्ही जेलभरो करायला गेलो तुम्ही आलात, असं बच्चू कडू म्हणाले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारनं केलेल्या विनंतीप्रमाणं बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. या काळात आंदोलन शांततेत सुरु राहिल्यास कुठलाही त्रास प्रशासनाकडून होणार नाही, असं पंकज भोयर म्हणाले. तर, बच्चू कडू यांनी आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं. सरकारनं कर्जमुक्तीची तारीख सांगावी यासाठी लढा असल्याचं म्हटलं.
“आम्ही काय घरच्यांसाठी आंदोलन करत नाही. हे तुम्ही बोलला होता, तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. एमएसपीच्या 20 टक्के बोनस दिला होता. यावर्षी खरेदी देखील सुरु झाली नाही, गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी सुरु झाली होती,” असं बच्चू कडू म्हणाले.
यावेळी आशिष जयस्वाल यांनी सरकारसोबत चर्चेला वेळ द्यावा, सरकार योग्य निर्णय घेईल, असं म्हटलं.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आलो आहे. सरकार आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल, आपण वेळ द्यावी, चर्चेतून मार्ग निघेल. यावर बच्चू कडू यांनी दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी बोला आणि फोन लावा आणि कर्जमुक्तीबाबत हो आहे की नाही याबाबत विचारा, असं म्हटलं.
राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल व ना. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी मोबाईल द्वारे संवाद घडवुन आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी मुंबईत चर्चेचे बच्चु कडुंना दिले निमंत्रण,आम्ही मुंबईत बैठकीला गेलो तरी आमचे आंदोलन सुरुच राहणार-बच्चु कडुंचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चु कडु यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले. यावेळी आंदोलक सहकाऱ्यांशी चर्चा करुन बच्चू कडूंनी समत्ती दिली व त्याचबरोबर त्यांनी मंत्री महोदयांना चेतावले कि आम्ही नागपुर खंडपीठाचे आदेशाचे पालन करुन आम्ही महामार्ग खाली करुन मैदानावर जाणार आहोत. आम्ही उद्या मुंबईतील बैठकीस येणार परंतु आमच्या माघारी तुमच्या पोलिसांनी कोणता त्रास देऊ नये. उद्याच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला तर आम्ही आंदोलन मागे घेणार अन्यथा परवा आम्ही संपुर्ण राज्यभर रेल रोको आंदोलन करणार असा इशारा यावेळी बच्चु कडुंनी दिला. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारला चेतावणी ही देत म्हणाले की, आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. आमचे आंदोलन सुरुच राहणार. आम्ही मुंबई त चर्चेसाठी गेलो तरी आमचे आंदोलक इथे ठिय्या आंदोलन करणार.



































