भाजप तर्फे अजय कदम,कांग्रेस चे शकुर नागाणी ,निरज लोणारे तर वंचित चे दादा कांबळे,नगरकर ची नावे चर्चेत
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी/नागपुर : 30 आँक्टोबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी सर्व राजकीय पक्षांवर आघाडी घेत अजय कदम यांचे नाव सार्वजनिक रित्या जाहीर करुन महसुलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्वकांक्षेला एकप्रकारे सुरुंग लावला असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
बावनकुळे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय मोठे व्यावसायिक व ठेकेदार असलेले अजय अग्रवाल यांना नगराध्यक्ष पदासाठी उतरविण्याच्या तयारीत होते. खाजगीत कित्येक वेळा त्यांनी भाजप पक्षांच्या कार्यकर्त्यांपुढे बोलुनही दाखवले अशी चर्चा असतांना माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी त्यांचे निकटवर्तीय माजी उपाध्यक्ष अजय कदम यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करुन भाजप सहित कांग्रेस व इतर राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकले.एकीकडे बरिएमं तर्फे अजय कदम यांनी कामठी शहरात आपल्या भेटीगाठी दौरे सुरु केले आहे तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लाडके जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल (ठेकेदार) यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे करायचे आहे. कामठी नगरपरिषद निवडणुकीत भाजप बरिएमं युती टिकली तर सुलेखाताई कुंभारे ह्या अजय कदम साठी भाजपचे समर्थन मागतील आणि नाईलाजाने कामठी शहरात पीछेहाटीमुळे अजय कदम यांना भाजप नेत्यांनी समर्थन देणे हाच एक पर्याय आहे. जर भाजप बरिएमं युती झाली नाही तर कामठी शहरात बरिएमं नेत्या माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिष्ठेची नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे . भाजप इथे स्वबळावर लढते कि युतीत लढते याकडेही आता जनतेचे लक्ष लागले आहे. बरिएमं चे अजय कदम कि भाजप चे अजय अग्रवाल यांवर अंतिम निर्णय /तोडगा तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातून च निघेल. घटकपक्षाच्या प्रमुख नेत्या सुलेखाताई कुंभारे यांना कामठीत नाराज करणे भाजप नेत्यांना कठीण जाऊ शकते.
अजय कदम हे बरिएमं चे पदाधिकारी असुन त्यांची जनतेत चांगली पकड आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या कामठी नगरपरिषदेत ते उपाध्यक्ष म्हणून ही चांगले कार्य केले. परंतु गत नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप सोबत युती असतांना ही भाजप नेत्यांनी युती धर्म न पाळता भाजपचे माजी उपाध्यक्ष रंजित सफेलकर यांना भाजप नेत्यांनी पडद्यामागुन रसद पुरवली व त्यांना नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा केला अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. आणि त्यामुळे च हिंदु, उत्तर भाषी सिंधी, मारवाडी पट्ट्यातील मते डिवाईड केली गेली त्याचा फटका बरिएमं उमेदवार अजय कदम यांना बसला. अपक्ष उमेदवार रंजित सफेलकर यांनी घेतलेल्या 5 हजार मतांचा फटका अजय कदम यांना भेटला. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहजहाँ शफाअत अन्सारी हे विजयी झाले. बरिएमं चे उमेदवार अजय कदम यांचा अल्पमताने झालेला पराभव हा सुलेखाताई कुंभारे यांना शाँक होता.बरिएंम चे 2 नगरसेवक निवडून आले तर भाजप चे फक्त 8 नगरसेवक विजयी झाले. कांग्रेस चा अध्यक्ष, उपाध्यक्ष व सत्ता बसली. बसपाच्या नगरसेविका रमा गजभिये झाल्या. परंतु 2021 पासुन संदीप बोरकर मुख्याधिकारी असतांना शेकडो कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला 2021 च्या तक्रारीवर कांग्रेस चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांचेवर 10 आँक्टोबर 2025 रोजी कोर्टाचे आदेशानुसार कामठी पोलीस स्टेशन ला FIR दाखल झाला. कामठी नगरपरिषद चा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आल्याने कांग्रेस बैकफुट वर आली तर नगरपरिषद च्या प्रशासकीय राजवटीत स्थानिक भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर पुन्हा मुख्याधिकारी बोरकर यांचे माध्यमातून करोडो रुपयांची उधळपट्टी विकासकामांच्या नावाने भाजपच्या ठेकेदारांवर केली गेली. निक्रृष्ट दर्जाची कामे या प्रशासकीय राजवटीत केली गेली असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी केला त्यामुळे सध्या जनतेच्या मनात भाजप नेते व ठेकेदार यांचे सोबत कांग्रेस च्या स्थानिक नेत्यांवर ही नाराजी व्यक्त होत आहे.
कांग्रेस पुन्हा शाहजहाँ शफाअत अन्सारी यांनाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून उभी करणार होती. परंतु भ्रष्टाचारात त्यांचे नाव पुढे आल्याने आता कांग्रेस पुढे पेच निर्माण झाला आहे. कॉग्रेस चे माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.शकुर नागाणी कांग्रेस चे जेष्ठ स्थानिक नेते असुन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मध्ये महा सचीव सुद्धा राहिले आहे. त्यांचेकडे प्रशासन चालविण्याचा अधिकार आहे असे नागाणी समर्थकांना वाटते.दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी ओपन जागेतुन कांग्रेस चे युवा नगरसेवक निरज लोणारे यांना सुद्धा उमेदवारी मिळावी अशी कामठी शहरात मागणी होत आहे. कामठी शहरात मुस्लिम समाजाच्या पाठोपाठ बौद्ध समाजाची मते आहेत. कॉग्रेस कडुन निरज लोणारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कांग्रेस मधील एक गट सक्रीय आहे.निरज लोणारे हे कांग्रेस नेता सुनील केदार, सुरेश भोयर गटाचे आहेत. तर शकुर नागाणी हे मुकुल वासनिक गटाचे ओळखले जातात.
वंचित बहुजन आघाडीतर्फे पुन्हा एकदा प्रमोद (दादा) कांबळे, प्रशांत नगरकर व बसपा कडुन विक्रांत मेश्राम, किशोर गेडाम यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. तर एआयएमआयएम तर्फे पुन्हा एकदा शकिबुल रहमान यांच्या नावाची चर्चा आहे.



































