… आणि आमदार फिरताहेत चहा घ्यायला घरोघरी!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services.
कामठी /नागपुर : 27 जुलै 2025
एरव्ही विधानसभा क्षेत्रामध्ये शेकडो कोटी रूपयांचा विकासनिधी आणण्यासाठी राज्यातील आमदारांची एकमेकांसोबत चढाओढ आपण बघतो. पण नागपुर जिल्ह्य़ातील कामठी विधानसभा क्षेत्रात मागील 21 वर्षात एकही उल्लेखनीय विकासकार्य येथील स्थानिक भाजप आमदार महोदयांनी आणले का नाही? एकही डळक उल्लेखनीय कार्य सांगण्यात भाजप नेते कार्यकर्ते जनतेला सांगण्यात अपयशी ठरलेत.मग या विधानसभेत हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला तो कुठे गेला? सिमेंट रोड, समाजभवन,उड्डाणपुल. रस्त्यांच्या नावाखाली जवळच्या ठेकेदारांमार्फत हा निधी गडप झाला कि काय? अशी जनतेला शंका वाटते.
तब्बल 21 वर्षापासून भाजप चा आमदार या भागात आहे. कामठी ला ऊर्जामंत्री /पालकमंत्री /महसुलमंत्री अशी मोठी कैबिनेट मंत्रीपदे मिळाली मग कामठी विधानसभा अजुनही विकासापासून उपेक्षित का? कामठी विधानसभेत एकही MIDC स्थानिक भाजप आमदार आणु शकले नाही. एकही उद्योगधंदा /कारखाना कामठी विधानसभेत आमदारांनी का आणला नाही? या भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार नसल्याने या भागात गुंडागर्दी /अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेत. MD, ड्रग्ज ची तश्करी /विक्री, सटटापट्टी अवैध दारुची दुकाने या भागात वाढली.विद्यार्थी/युवा नशेच्या आहारी चाललेत. यांवर अंकुश लागत नाही. मागे ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुविक्री, सटटापट्टी चालते तेथील ठाणेदारास अतितात्काळ बडतर्फ केले पाहिजे. पण ते काही होत नाही. कामठी विधानसभा च नव्हे तर नागपुर शहरात MD ड्रग्ज येतेच कशी? यातुन गुन्हेगारी तत्व वाढत आहे.

कामठी मधील विविध झोपडपट्ट्या अजुनही विकासापासून वंचित आहेत. मुस्लिम बाहुल एरियात घाणीत डुकरांचा हैदोस आहे. याकडे स्थानिक नगरपरिषद चे दूर्लक्ष होत आहे. विविध भ्रष्टाचाराचे आरोप मूख्याधिकारी यांचेवर लागतात.स्थानिक जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी, मालकी हक्काचे पट्टे, पुरग्रस्तांना आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी.,शेतकऱ्यांना धानाचा बोनस यासाठी आजही मोर्चे काढावे लागतात हे दुर्देव आहे जनतेचे. कामठी विधानसभेत निक्रृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, बनलेत. निर्माणाधिन उड्डाणपुलावर मोठे गड्डे उद्घाटनापुर्वीच पडतात. मात्र निक्रृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीच ब्लैकलिस्ट ची कारवाई स्थानिक भाजप आमदार यांनी केली नाही. यावरुन स्थानिक भाजप आमदार व ठेकेदार यांच्यात अंतर्गत आर्थिक हितसंबंध तर नाही ना? भाजपशी जुळलेल्या खास कमर्शियल ठेकेदारांची बैलेसशीट चे आकडे दहापटीने वाढलेत. त्याचेवर कधीच ईडीची कारवाई होत नाही. मग अशावेळी जनता विकासासाठी ओरडते.. तर त्या जनतेला वाली कोणीच नसतो. पुरग्रस्त भागात कधीच स्थानिक आमदारांचा दौरा नसतो. पुरपिडितांची साधी भेट घेतली जात नाही. फक्त एसीत बसुन अधिकाऱ्यांना दमदाटी /निर्देश दिले जाते. बिना संगम चे रहिवासी आजही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. दरवर्षी तेथील भाजप चे हौसनौसे कार्यकर्ता पुनर्वसनाचे गांजर आमदारांकडून जनतेला देतात.कामठी शहरातील मुख्य महामार्गावर मागील 20 वर्षे फक्त मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण धारकांना पोसले गेले यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा नाराज असल्याची सुत्रांकडुन माहिती मिळते . मुख्य महामार्ग केव्हा रुंद होणार? या अतिक्रमणधारकांना राजकीय संरक्षण का? असा सवाल जनतेचा आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जिम्मेदारी कोण घेणार?
तत्कालीन माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांचे काम अजूनही दिसते.

कामठी विधानसभेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे ह्या पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांच्या काळात बांधलेल्या पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आजही उल्लेखनीय कामाच्या ग्वाही देतात. आजही कित्येक खेडेगावात कोणताही जात/पक्षभेद न करता तत्कालीन राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी कित्येक खेडेगावात पिण्याचे मुबलक स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले होते. नगरपरिषद /कामठी न्यायालयाच्या इमारती विकासाची ग्वाही आजही देतात.कामठी शहराला शोभेल अशा जागतिक स्तराचे आंतरराष्ट्रीय ड्रैगन पैलेस टेंपल /ड्रैगन इंटरनैशनल स्कुल /दादासाहेब कुंभारे आयटीआय /ड्रॅगन मेडिटेशन सेंटर च्या माध्यमातून कोणतेही राजकीय पद नसतांना हजारो युवक /युवती/महिला /पुरूषांना रोजगार व पर्यटन उपलब्ध करून दिले.अशा समाजसेवी निष्कलंक व सर्वधर्म समभाव मानणाऱ्या एका निःस्वार्थी जनप्रतिनिधी ला कामठी ची जनता मुकली. कांग्रेस च्या बंडखोरीमुळे भाजप चा या क्षेत्रात उगम झाला आणि आता विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराची गंगा कामठी विधानसभेत वाहते.
मागील 21 वर्षात रोजगार उद्योगधंदे /या सोबत विकासकामांवर स्थानिक आमदारांनी लक्ष दिले असते तर आज घरोघरी निवडणुकीच्या तोंडावर चहापाण्यासाठी जाण्याची स्थानिक आमदारांवर वेळच आली नसती असेही राजकीय वर चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर कामठी विधानसभेत काग्रेस अगदी दुबळा विरोधक म्हणून ओळखला जातो. आपापसात सत्तासंघर्ष व गटबाजी यामुळे कामठी विधानसभेत कांग्रेस मजबुत नाही. याचा फायदा नेहमी भाजप नेते उचलतात आणि त्यामुळे मागील 25 वर्षापासून कांग्रेस सातत्याने पराभवाला सामोरे जात आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप बीएमएमं, कांग्रेस, बसपा, वंचित, एआयएमएमाएम मध्ये उमेदवार चाचपणी. बांधनी सुरु आहे.
कामठी तील जनता स्थानिक भाजप आमदारांवर नाराज
कामठी विधानसभेतुन स्थानिक भाजप आमदार यांना मते मिळाली नाही, मगे राहिले ही खंत वेळेवेळी स्थानिक भाजप आमदार हे खाजगी त बोलुन दाखवतात. त्यांचे खास कमर्शियल ठेकेदार जे नागपुर भाजप चे कोषाध्यक्ष आहेत त्यांनी एका चैनलवरील मुलाखतीत बोलले कि त्यांच्या नेत्यांनी मागील 20 वर्षात एकही काम केले नाही हे नेरेटिव पसरवले जात आहे. कामठीतील जनतेकडून पाहिजे तसे प्रेम /मते भाजप च्या आमदारास मिळाले नाही. ते मागे राहिले. आम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे काम घेऊन जावे? आम्हाला लाज वाटते असेही ते भाजप चे कोषाध्यक्ष सांगतात. यावरुन स्थानिक आमदाराची ही मळमळ नेमकी कशासाठी? आज ते निवडुन आले मागील 7 महिन्यात एकही भुमिपुजन /उद्घाटन त्यांनी केले नाही. मात्र दररविवारी ते 2-2 तास चहापाण्याच्या कार्यक्रमासाठी जातात. हे अवघड जागेवरच दुखणे आहे. भाजपचे सहकारी मित्रपक्ष असलेल्या बरिएमं च्या कार्यकर्त्यांच्या घरी चहा घ्यायला नेमके एखाद्या वरिष्ठ भाजप च्या मंत्र्यांना जावे लागते! त्यांना कामे देणे 5-10 हजारांची आर्थिक मदत सुरु करणे यातुन स्थानिक भाजप आमदार नेमके काय साध्य करतात? यामुळे स्थानिक भाजप व बरिएमं मध्ये आंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. बौद्ध व मुस्लिम मतदारांनी स्थानिक भाजप आमदारांकडे खरोखर पाठ फिरवली हे वास्तविक सत्य आहे. म्हणून तुम्ही मुस्लिम व बौद नेत्यांना टोमणे मारु नाही शकत. सिंधी, मारवाडी बाहुल एरियातील नागरिकांची नाराजी स्थानिक आमदारांना अडचणित आणु शकते. कामठी मौदा विधानसभेच्या विकासासाठी विजन नाही एका विजनरी नेत्रृत्वाची आज ही कामठी ला गरज आहे! परत एकदा कामठी नगरपरिषद च्या विकासासाठी बरिएमं नेत्या सुलेखाताई कुंभारे यांनी राजकारणात दमखमाने उतरावे अशी जनतेची मागणी आहे.



































