श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal media services.
नागपुर : 23 जुलै 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रृहजिल्ह्यातील शासकीय वस्तीग्रृहातील विद्यार्थींनींच्या सूरक्षेचा प्रश ऐरणीवर आला आहे. थेट वस्तीग्रृहात विद्याथींनीवर दोन अद्यात आरोपींनी अतिप्रसंग /विनयभंग केल्याची घटना समोर येत आहे. त्यामूळे महिला सुरक्षेवर वस्तीग्रृह प्रशासनाकडून हलगर्जीपणा दिसुन येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ग्रृहखाते आहे पण ग्रृहखात्यातील पोलिस अधिकारी सूद्धा घटनेचा FIR करत नाही किंवा घटनेचा कोणताही तपास करीत नसल्याचे ही सुत्रांकडुन माहिती मिळत आहे.
नागपूर शहरातील IC चौकातील एका शासकीय मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात आरोपींनी वसतिगृहात घुसून एका विद्यार्थिनीच्या खोलीचे दार तोडून तिचा विनयभंग केला आणि तिचा मोबाईल हिसकावून फरार झाले.
प्राप्त माहितीनुसार, शासकीय मुलींचे वसतिगृह, आय सी चौक नागपूर येथे दिनांक 22 जुलै च्या मध्यरात्री रोजी मध्यरात्री 2 ते अडीच दरम्यान दोन अज्ञात युवक वसतिगृहामध्ये घुसलेत. एका इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तिने आरडाओरड केली असता तिचा मोबाइल हिसकाऊन पसार झाले.मुलींच्या वातिगृहामध्ये सुरक्षिततेचे कोणतेही उपाय नाही, सीसीटीवी कॅमेरा नाही, सेक्युरिटी गार्ड नाही. घडलेला प्रकार तेथिल वार्डनला सांगितल्यावर देखील वार्डन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही.
पोलिसांना याबाबत माहिती दिली असता, MIDC पोलिसांनी FIR दाखल केली नाही, चौकशी शुरू केली नाही, आरोपिंना शोधण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ज्या नागपूरचे आहेत तिथेच मुली सुरक्षित नाही. कल नागपूरमध्ये मुलींच्या वासतिगृहात शिरुन आरोपींनी विनयभंग केला. या वसतिगृहातील मुली प्रचंड घाबरल्या असून त्यांना सुरक्षेची हमी कोण देणार या वसतिगृहात 64 मुली राहतात या वसतीगृहाच्या जवळच दारुचे दुकान असल्याने या मुलींना जाता येता कायमच सुरक्षित वाटते. वसतिगृहात दरवाज्याला साधे लॉक नाही अशा स्थितीत या मुली कशा राहणार या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे राज्यातील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवली पाहिजे.या वसतिगृहात तात्काळ सीसीटीव्ही बसवले पाहिजे. तसेच राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहात खबरदारी घेतली पाहिजे.मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणी मुलींची काय हालत असेल या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने झटकुन टाकु नये.

