श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online services.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 28 जानेवारी 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 नागपुर – छिंदवाडा महामार्गावरील महादुला येथील ओव्हर ब्रिज रोडच्या कडेला असलेला स्ट्रीट लाईट पोल कधीही कोसळुन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. गायत्री किराणा स्टोअर(खंडेलवाल) च्या समोर असलेला स्ट्रीट लाईट पोल मधील फाउंडेशन प्लेट चे तीन नट बोल्ट संपूर्ण मध्ये निघालेले आहे. दुसऱ्या बाजुचे 3 नट बोल्ट वर हा स्ट्रीटलाईट हलकासा वाकड्या अवस्थेत झुकलेला दिसतोय. याकडे एम एस डी आर सी व NHAI (राष्ट्रीय महामार्ग अथारिटी चे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे.

सावनेर ते नागपुर उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरु असते. हा पोल वाहतुकीच्या रोडवर अचानक केव्हाही पडू शकतो .त्यामुळे रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या चार चाकी/दुचाकी वाहन अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते.लवकरात लवकर याकडे या क्षेत्रातील महादुला नगराध्यक्ष हेमलता सावजी तथा महसूलमंत्री आणि नागपूर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधुन या स्ट्रीट लाइट चे फाऊंडेशन कांक्रीट दुरुस्तीकरिता लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरुन एखादी मोठी दुर्घटना टाळली जाईल.


































