श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
महादुला-कोराडी /नागपूर : 13 एप्रिल 2025
उद्या संपुर्ण जगात महामानव, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे.संपुर्ण भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय व अहिंसा या पंचसुत्रावर आधारित सर्वोत्कृष्ट भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रति क्रृतज्ञता प्रकट करण्यासाठी दरवर्षी जगभरात करोडो आंबेडकर प्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रैली, रक्तदान, पुस्तक, वह्या वाटप, भोजनदान, तसेच वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मानवंदना देत असतात.
परंतु मागील काही दिवसांपासून भीम जयंती सारखे शांततामय मार्गाने होणारे कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी समाजातील काही समाजकंटक दारु पिऊन धुडगुस घालतात. त्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा काही दारुडे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून प्रयत्न होतात. यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संपुर्ण राज्यभरात 14 एप्रिल 2025 ला दारु बंदी करावी. शासनाने भीम जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर केली व सर्व शासकीय कार्यालये यांना भीम जयंतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कयण्याचे निर्देश ही दिले परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिल 2025 ला दारु ची दुकाने, बियर बार, बियर शाँपी, तसेच अवैध दारुची दुकाने ही 100% बंद ठेवावी अशी मागणी महादुला-कोराडी येथील पंचायत समितीचे माजी सभापती तसेच धम्मकुटी स्मारक क्रृती समिती चे अध्यक्ष सचिन मानवटकर यांनी एका निवेदनाद्वारे कोराडी पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनाद्वारे सचिन मानवटकर यांनी अवगत केले की 14 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात दारुची दुकाने बियर शाँपी बियर बार व अवैध दारू ची दुकाने सुरु असतात. यांवर कोराडी पोलिसांनी अतिताक्काळ लक्ष घालून या परिसरातील सर्व दारुची वैध व अवैध दुकाने पुर्णतः बंद ठेऊन सामाजिक सौहार्द कायम ठेवण्यासाठी कोराडी पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती धम्मकुटी स्मारक क्रृती समितीचे अध्यक्ष सचिन मानवटकर, उपाध्यक्ष विजय ढोणे, सचिव उत्तम गेडाम, कोषाध्यक्ष चुडामन सोनडवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
