नागपुरात म.ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव तसेच बरिएमं चा 19 वा स्थापना दिन मोठ्या धडाक्यात साजरा
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
नागपुर‘ 11 एप्रिल 2025
महात्मा ज्योतिबा फुले व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा शुभारंभ बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या 19 व्वा यर्धापनदिनी आज नागपुरातील सिताबर्डी येथील मधुरम सभागृह, हिंदी मोरभवन येथे मोठ्या धडाक्यात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा बरिएमं च्या संस्थापिका ॲड. सुलेखाताई कुंभारे तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत गोंड राजे विरेन शाह यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. विकास महात्मे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर, मराठा महासंघाचे दिलिप खोडके, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर जिल्हा सहसचिव डॉ. युगल रायलु, प्रा. पंकज कुरळकर(म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्था संचालक), डॉ. कुणाल पडोळे (युवा फाऊंडेशन नागपुर – अध्यक्ष), आंबेडकरी विचारवंत विनायक जामगडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. पंकज कुरळकर, डॉ. युगल रायलु यांनी देशात ब्रिटिश सरकार असतांना महिलांसाठी शाळा उघडण्यापासुन तर विधवा महिलांचे केशवपण प्रथा रोकणे तसेच त्यांच्या अनाथ मुलांसाठी अनालये सुरु करण्यापासून तर सत्यशोधक समाजाची निर्मिती महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महत्वपूर्ण योगदानावर आपले अमुल्य विचार मांडले.


लांगमार्चे चे प्रणेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी आपल्या भाषणात, रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य व्हावे यासाठी केलेले आमरण उपोषण व आंदोलन तसेच महाबोधिविहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी सुप्रिम कोर्टात पिटिशन दाखल करणाऱ्या पहिल्या एकमेव महिला नेत्या असल्याचे गौरवोद्गार काढले.
तर गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी साजक्रांतीचे खरे जनक म.ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यांवर न घेता डोक्यांत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्गाटक राजे विरेन शाह यांनी सांगितले की, गोंड आदिवासी समाज आजही उपेक्षित व वंचित आहे. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी दलित आदिवासी समाजाला एकत्रित सोबत घेऊन समाजविकासा साठी आपण मोट बांधावी अशी सुलेखाताई कुंभारे यांना साद घातली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बरिएमं नेत्या माजी राज्यमंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 130 कोटी भारतियांचे नेते असुन सामाजिक क्रांतीचे जनक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यांवर व डोक्यात ही घेणार. आपल्या सोबत किती लोक आहेत हे जरुरी नाही पण लढणे जरुरी आहे. रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्यासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहणार. आम्ही रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणणारच. महाबोधिविहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी संपुर्ण देशातुन एक महिला म्हणून सुलेखा नलिनी नारायणराव कुंभारे च्या नावाने मी सुप्रिम कोर्टात वकिलाचा कोट व गाऊन घालुन दाखल केली आहे. 13 वर्षापुर्वी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी सुप्रिम कोर्टात जेव्हा पिटिशन दाखल केली तेव्हा रामजन्मभूमी चा निर्णय लागला नव्हता. परंतु. माझ्या पिटिशन मध्ये मी हा मुद्दा उपस्थित केला की, जर आपण आस्थावर राम जन्मभुमीचा चा निर्णय देऊ शकता तर बौद्धांच्या आस्थेचा आदर करीत महाबोधिविहार बौद्धांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे. मला समाज काय देईल यापेक्षा मला समाजाला काय देता येईल इतके परिपक्व वैचारिक धार्मिक कार्य माझ्या हातुन घडेल अशी ग्वाही यावेळी सुलेखाताई कुंभारे यांनी उपयवर्थितांना दिली.
बरिएमं च्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांना मोठा पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन बरिएमं च्या माजी नगरसेविका वंदना भगत यांनी तर आभार बरिएमं चे अजय कदम यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बरिएमं पदाधिकारी दिपंकर गणविर, अशपाक कुरेशी, रेखा भावे, रजनी लिंगायत, सावला सिंगाड़े, रजनी गजभिये, सुकेशीनी मुरारकर, उषा भावे, देवांगना गजभिये, नंदा गोडघाटे, मिरा शंभरकर, विष्णु ठवरे, रवी रंगारी,राजु वैद्य, विनोद बागडे, अरविंद वाळके, प्रभाकर ढोके, विलास चंदनखेडे, दिनेश बंसोड, राजु गोरले, सुनिल वानखेडे, सचिन नेवारे, नरेंद्र चव्हाण, आदींनी अथक परिश्रम केले.

