नाव कमी करण्यासाठी अर्ज देऊनही निवडणुक अधिकाऱ्यांनी नाव कमी न केल्याचा भोयर यांचा खुलासा
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 6 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी विधानसभा सध्या देशपातळीवर हायवोल्टेज ” Votechori” या मुद्यावर गाजत आहे. कांग्रेसचे नेता खा. राहुल गांधी यांनी मागे 5 महिन्यापुर्वी नवी दिल्ली येथे पत्रपरिषद घेत कामठी विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपने 35 हजार मते मतदारयाद्यात जोडली. इथे विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर या निवडणुकीत 35 हजार मतांचा घोळ करीत भाजप उमेदवार यांनाच ती मते गेली असल्याचा त्यांनी आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 6-7 महिन्यात नविन 35 हजार मतांची वाढ कशी झाली असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी केले होते.
या मतदारयादीद्यात दुबार नावे, म्रृतकांची नावे व परराज्यातील मतदार आँनलाईन पद्धतीने जोडल्याचा ही आरोप वेळोवेळी लागला. या निकालानंतर कांग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर व खा. शामकुमार बर्वे यांनी सुद्धा मतदारयादीत घोळ करुन भाजप ही सीट जिंकली असा थेट आरोपही यांनी मीडिया समोर मांडला.
त्यानंतर आज सोशल मीडिया वर भाजपतर्फे एका वायरल पोस्ट मधुन असा आरोप करण्यात आला की दुबार नावांवर राहुल गांधी यांनी मतदारयादीत घोळ सांगितला. तिथे कांग्रेसचे पराभुत उमेदवार सुरेश भोयर यांचे दोन वेळा नाव मतदारयादीत कसे असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया तुन आज विचारला होता…



मतदारयादीत टाकलेले दुबार नाव वगळण्यासाठी येरखेडा नगरपंचायत ला 3 नोव्हेंबर ला केला होता अर्ज – सुरेश भोयर यांचा खुलासा
कांग्रेस नेता सुरेश भोयर यांचेशी आम्ही या आरोपांवर प्रश्न केला असता. त्यांनी भाजपवर पलटवार केला की, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आचारसंहिता लागू झाली आहे. कांग्रेसकडुन आम्ही बौद्ध समाजाच्या सरिताताई रंगारी ह्या जनतेतुन थेट निवडुन आणल्या हे भाजप नेत्यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी येरखेडा ग्रा पं. ला नगरपंचायत बनवली. येरखेडा नगरपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच मतदारयाद्या निवडणुक अधिकारी व मुख्याधिकारी येरखेडा यांनी तयार केल्या होत्या. त्यात माझे नाव दोन वेळा टाकण्यात आले. पण हे जसे माझ्या निदर्शनास आले. मी ताबडतोब दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपंचायत चे प्रशासक यांच्याकडे एक लेखी अर्ज दाखल केला की, माझे या यादीत दुबार नाव आले आहे. वार्ड क्र. 2 मध्ये अ. क्र. 818 व अ. क्र. 822 वर दोन वेळा माझे नाव यादीत टाकण्यात आले. अ. क्र. 818 वरील माझे नाव बरोबर असुन अ. क्र. 822 वरील नाव चुकीचे आहे. त्यामुळे या दुबार नावातील अ. क्र. . 822 वरील माझे चुकीचे नाव वगळण्यात यावे असा अर्ज मी प्रशासक नगरपंचायत येरखेडा यांना करुनही त्यांनी माझे नाव कमी केले नाही. निवडणुक याद्या तयार करायचे काम हे निवडणुक अधिकारी यांचे आहे, त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासक /मुख्याधिकारी काम करतात मतदारयाद्यात दुबार नाव आलेच कसे? असा माझा प्रश्न निवडणुक अधिकारी यांना आहे? येरखेडा नगरपंचायत मध्ये प्रशासक राजवट भाजपच्या नेत्यांनी आणली सर्व अधिकारी भाजप नेत्यांच्या दबावाखाली करतात.आमचे नेता राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेतील वोटचोरीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे देशभरात कामठी विधानसभा चर्चेचा विषय बनली आहे. सत्ता तुमची आहे. प्रशासक मुख्याधिकारी तुमचेच आहेत. निवडणुक अधिकारी पण तुमचेच मग माझे येरखेडा नगरपंचायत निवडणुकयादीत जानुनबुजुन टाकलेले दुबार नाव अर्ज करुनही कमी का केले नाही? याला जिम्मेदार कोण आहे? असा पलटवार कांग्रेस नेता सुरेश भोयर यांनी केला.


































