कनिष्ठ अधिकाऱ्याला पदोन्नती दिल्याने संघमित्रा ढोके करणार 14 जुलै पासुन आमरण उपोषण !
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services.
नागपुर : 6 जुलै 2025
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त गट अ पदावर कार्यरत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक जेष्ठ महिला अधिकारी संघमित्रा ढोके यांना दिव्यांग प्रवर्गातून सेवाज्येष्ठता यादीनुसार पात्र असतांना ही पदोन्नती पासुन वगळल्याने त्या आता 14 जुलै 2025 पासुन आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती संघमित्रा ढोके यांनी दिली.

संघमित्रा ढोके यांनी महादुला नगरपंचायत, खापा. सावनेर नगरपरिषद या ठिकाणी प्रामाणिक पणे सेवा दिली त्यानंतर त्यांची नागपुर विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नती झाली. मागील काही वर्षांपासून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा प्रशासनात ठसा उमटविला आहे. त्या खापा नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत असताना उत्क्रृष्ट नगरपरिषद म्हणुन 2 कोटी रुपयांचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवित हागणदारीमुक्त पुरस्कार देखील खापा नगरपरिषदेला त्यांनी मिळवुन दिला. सावनेर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत असतांना संघमित्रा ढोके यांनी हरित खत ब्रैंड मिळवणे व खताची निर्मिती सुद्धा केली. त्यांच्या उत्क्रृष्ट कार्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या काळात भ्रष्टाचार मूक्त प्रशासन होते. त्यांचा स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर शिस्त व सेवा याबाबतीत अत्यंत चोख लक्ष होते. कामचुकार करणारे कर्मचारी यांना नियमित वे वेळेत सेवा देण्यासाठी त्यांनी बाध्य केले होते. जनतेच्या मनात एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक निष्पक्ष सेवा देणारा महिला अधिकारी म्हणून संघमित्रा ढोके यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.




परंतु दि. 29/7/2024 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 30/6/2016 ला दिव्यांग प्रवर्गातून आरक्षणा नुसार पदोन्नती देवून सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून पुढील पदोन्नती चा लाभ दिनांक 7/7/2025 पर्यंत त्यांना मिळणे आवश्यक होते.
परंतु दिनांक 11/3/2022 रोजी झालेल्या DPC च्या अहवालामध्ये संघमित्रा ढोणे यांच्या नावासमोर दिलेल्या अभिप्रायात ACB ची कारवाई सुरू आहे असा बदनामी कारक अभिप्राय लिहून त्यांची नाहक बदनामी केली गेली.सेवा कालावधी मध्ये कधीही त्यांच्यावर अशा प्रकारची ची कारवाई झालेली नाही तरीही त्यांना विनाकारण बदनाम केले गेले.
सावनेर नगर परिषद मध्ये कार्यरत असताना घनकचरा व्यवस्थापन बाबत अनियमितता ही संघमित्रा ढोके मुख्याधिकारी कार्यरत कालावधीत नसतांनाही सुद्धा लोकायुक्त प्रकरणात त्यांच्या कालावधीत दाखवून त्याचेवर DE सुरू करण्यात आली हे जानुनबुजुन त्यांना बदनाम करण्याचा काहींनी कट रचला होता.
पाठक सर PS (ud) कडे यासंदर्भात पाठपुरावा केल्यामुळे DE मधून दिनांक 18/4/2022 रोजी ढोके यांना वगळण्यात आले होते हे विशेष!
त्याच अहवालात अंतिम परिच्छेद मध्ये अपंगांसाठी चे एक पद राखून ठेवण्यात आले. चौकशी पूर्ण झाल्यावर पदोन्नती देण्यात यावी असे नमूद असताना सुद्धा पुढल्या DPC पर्यंत त्यांची अडवणूक करुन दि.18/4/2022!ला झालेल्या पदोन्नती पासून त्यांना नाहक डावलण्यात आल्याचा आरोप संघमित्रा ढोके यांनी केला.
याबाबत सातत्याने त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा संघमित्रा ढोके यांना पदोन्नती दिली नाही. जेव्हा की मागच्या वर्षीच्या DPC मध्ये अपंग कोट्यातील पद राखीव ठेवण्यात आले होते . हे पद इतरत्र वापरण्यात आले.दि. 29/7/2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग कोट्यातून पदोन्नती ची मागणी केली असताना त्यांना फक्त 26 दिवस सेवानिवृत्ती ला शिल्लक असताना सुद्धा पदोन्नती देण्यात आली नाही.. व सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करून पुढील पदोन्नती व लाभ देण्यात आला नाही.
यावर कहर म्हणून त्या ज्या कार्यालयात सहायक आयुक्त गट अ म्हणून कार्यरत आहे तिथे त्यांच्या वरिष्ठ पदावर म्हणजे उपायुक्त (S.23) पदावर त्यांच्या पेक्षा कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला पदस्थापना देवून संघमित्रा ढोणे यांच्यावर प्रशासनाने अन्याय केल्याचा आरोप ढोके यांनी केला.प्रशासकीय बाब समजून इमामे इतमामे त्या प्रामाणिक सेवा देत आहेत.
त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या लढत राहणार असून येत्या 14 जुलै 2025 पासुन संघमित्रा ढोके ह्या आमरण उपोषण करणार असा इशारा एका निवेदनातून त्यांनी प्रशासनाला दिला आहे.



