श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Portal Media Services.
महादुला नगरपंचायत /नागपुर :19 जुन 2025
नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातील महादुला नगरपंचायत हे सर्वाधिक अविकसित, घाणीचे साम्राज्य असलेले व भ्रष्टाचाराने बरबटलेले शहर असल्याचे येथील अभ्यासु सुज्ञ नागरिक बोलतात. याचा आम्ही आढावा घेतला. आणि सत्य काय आहे ते जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न केला. महादुला ला नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर भाजपला पुर्ण बहुमत
सन 2014 ला महादुला ग्रा पं. चे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले त्यावेळी तत्कालीन आमदारांनी भाजप च्या हाती एकहाती सत्ता आल्यास महादुला शहरात सुसज्ज बाजारपेठ, उद्याने, मैदाने, डीपी प्लान तयार करुन कायापालट करणार असे आश्वासन दिले. जनतेने ही भाजप आमदारांना एकहाती सत्ता दिली. पण त्या पहिल्या पंचवार्षिक कारभारात मोठमोठे घोळ समोर आले. पहिल्या दोन वर्षाचे आँडिट मध्ये ठेकेदारांना अवाजवी बिले काढुन दिली. टैक्स डिपार्टमेंट चा (बाबु) – ” खाबु” तर स्वतःला मालक समजायला लागला कारण त्याची पत्नी अध्यक्ष होती. मग मोठमोठे भ्रष्टाचार टैक्स विभागात केले. टैक्स पावती ची लाखो रुपयांची वसुली केली गेली. पण पैसा नगरपंचायत मधील गायब केला. 5-5 लाख रुपये रोकड लंपास केली गेली. बोगस गावठाण प्रमाणपत्र व नमुना 8 वर सरपंच /मुख्याधिकारी यांच्या बोगस सह्या मारण्यात ही हा ” खाबु” चर्चेत होता. त्याचेवर तत्कालीन मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांनी कारवाई केली होती परंतु स्थानिक आमदाराचा आशिर्वाद असल्या कारणाने एटी करप्शन च्या कांड मध्ये सापडल्यानंतर ही हा ” खाबु” दिमाखात नगरपंचायत मध्ये पुन्हा पदावर विराजमान झाला. नियमबाह्य पद्धतीने निक्रृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, समाजभवन बांधले गेले. महादुला नगरपंचायत ची इमारत बांधण्यासाठी परवानगी घेतल्या नाहीत. एका जागेवरुन दुसऱ्या जागी इमारती विना परवानगी हलविल्या गेल्या. बाजारपेठेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा नगरपंचायत प्रशासनावर जनतेने आरोप केले. कचरा उचलण्याचे टेंडर मध्ये जनप्रतिनिधी यांची पार्टनरशिप ही वादाच्या भोवऱ्यात सापडली.
पहिल्या पंचवार्षिक मध्ये फेल झाल्यानंतर पुन्हा भाजप ला एकहाती सत्ता मिळाली. यावेळी आता तरी महादुला स्वच्छ व सुंदर शहर म्हणून पुढे येईल अशी आशा होती. परंतु निवडणुकीच्या वेळी फिरणारे आमदार निक्रृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, बगिचे बनले त्यांवेळी ते अचानक अद्रृष्य झाले. दोन ठिकाणी उद्याने बांधली. मात्र ओसाड पडली. एकही झाड, फुलझाडे याठिकाणी लावली गेली नाही. जिकडे पाहावे तिकडे शेण व गवत उगवले. निक्रृष्ट दर्जाचे सिमेंट रोड? गट्टु बसविण्याचे याठिकाणी कामे काढली. कामाची गुणवत्ता तपासण्याचा कुणाला रस नाही. गल्लोगल्लीत ठेकेदार तयार केलेत. स्थानिक आमदारांचे राजकारण फक्त ठेकेदारांच्व्व भोवताल झाले. आमदारांच्या मागे ठेकेदारांची लाँबी तयार झाली. भाजप नगरसेवकांनी स्वतःच्या “हवस्या नवस्या कार्यकर्त्यांच्या नावाने कामे लाटली. सर्व कामात भ्रष्टाचार झाला. रोड नाल्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयाची विल्हेवाट लागली. पण स्थानीय आमदार नेते “गांधारी” सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसले. महादूला शहरात विकासाच्या नावाखाली जवळपास 100 कोटी रुपयांच्यावर शासकीय निधी आला आणि तो गडप झाला. याची चौकशी करण्याची हिम्मत आणि महादुला नगरपंचायत चे 10 वर्षाचे आँडिट करण्याची मानसिकता जनतेला दिसत नाही. विना परवानगी 3-4 मजली अवैध इमारती उभ्या झाल्या. शासकीय जागेवर 3-3 मजली एखाद्या विशिष्ट धर्माच्या ईमारती उभ्या राहतात त्यावेळी महादुला नगरपंचायत चा अतिक्रमण विभाग चुप असतो. कारण वोटबैंक चे राजकारण असते. आणि स्थानिक जनप्रतिनिधी यांचे राजकीय संरक्षण असल्याशिवाय शासकीय जमिनीवर अवैधरीत्या 3 – 4 मजली ईमारती उभ्या राहुच शकत नाही.
टाँवरलाईन खालील जनता 50 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत!

मागील 50 वर्षापासून टाँवरलाईन खाली जवळपास 10-15 हजार नागरिक हायटेंशन लाईनखाली जीव मुठीत घेऊन राहतात. आजपर्यंत टाँवरलाईन खालील नागरिकांचे पुनर्वसन झालेले नाही. माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी सन 2002 मध्ये याच नागरिकांचे पुनर्वसनाची योजना तयार केली होती. त्यासंबंधाने शासकीय बैठका घेऊन शेकडो नागरिकांना तायवाडे काँलेज जवळ शासकीय पट्टे वाटप ही सुलेखाताई कुंभारे यांचे माध्यमातून झाले होते. परंतु तत्कालीन आमदाराने पडद्यामागुन विरोध करुन स्थलांतराची योजना यशस्वी होऊ दिली नाही असे कुंभारे समर्थक आजही म्हणतात. आजही टाँवरलाईन खालील नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची गरज आहे.
महादूला शहरात कोराडी ग्रा पं. च्या तुलनेत एकही ग्रीन जिम नाही. कोराडीत 7-8 ठिकाणी ग्रीन जीम लावल्या आहेत. मग महादुला येथे ग्रीन जीम लावण्याची इच्छाशक्ती स्थानिक आमदारात का नाही? 3 ठिकाणी पिण्याचे पाण्याचे R.O. फिल्टर मशीन लावल्या गेल्या. लाखो रुपये खर्च केलै. त्यातील 2 R. O. उद्घाटनापुर्वीच बंद झाले. 1 R. O. किरायाने दिला. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. वाढीव पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु गढुळ पाणी पिण्यास जनता मजबुर आहे. महादुला नगरपंचायत अंतर्गत कूठेच आरोगा उपकेंद्र नाही. 25 हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात तहसील स्तरावर आरोग्य उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. परंतु आरोग्याचा सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरलेत.
महादूला शहरात सार्वजनिक शौचालयातील साहित्य गेले चोरी. दोन ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे लाखो रुपयांचे संपुर्ण साहित्य चोरीला गेले. परंतु स्थानिक आमदारांनी स्थानिक जनप्रतिनिधी व जिम्मेदार अधिकारी यांचेवर कोणतीच कारवाई केली नाही. यावरुन लक्षात येते की, स्थानिक आमदारांना भ्रष्टाचार व भ्रष्ट जनप्रतिनिधी व अधिकारी प्यारे आहेत..
युवकांसाठी मैदाने,व जेष्ठ नागरिकांसाठी Walking Street नाही
महादुला नगरपंचायत येथील जेष्ठ नागरिक याना सकाळी मार्निंग वाँक करण्यासाठी Walking Street ची मागणी कित्येक वर्षापासुन रेंगाळली असुन या जेष्ठ नागरिकांनी केवळ भाजपा साठी मतेच द्यायची का? त्यांचेसाठी जनप्रतिनिधी यांनी काहीच योजना करु नये का? असे जेष्ठ नागरिक विचारतात.,
महादुला नगरपंचायत क्षेत्रात छिंदवाडा हायवेवर बसस्टॉप व सार्वजनिक शौचालये नाही
राष्ट्रीय महामार्गचे निर्माण करताना गाव तिथे शौचालये व बसस्टॉप जवळ शौचालय निर्माण करणे हायवे अँथारिटी ला बंधनकारक असतांना ही महादुला नगरपंचायत परिसरात हायवेचे काम करणाऱ्या ओरिएंटल कंपनीने CSR निधीतुन बसस्टॉप व शौचालये बांधली नाहीत ही शोकांतिका आहे.नागरिक उन्हापावसात रस्त्यावर उभे राहतात. लगतच्ग्रा कोराडी ग्रा.पं. हद्दीत 3 ठिकाणी बसस्टॉप आहेत. पण महादूला येथे एकही बसस्टॉप नाही.. जनप्रतिनिधी नगराध्यक्ष व स्थानिक आमदार यांचेकडुन नेहमी महादुला नगरपंचायत च्या विकासासावरुन दुजाभाव /भेदभाव करण्यात आला हे वास्तविक सत्य आहे.
महादूला नगरपंचायत निवडणुक पुढील 4-5 महिन्यावर आली असुन आताही जनतेला स्थानिक आमदाराने लालीपॉप दाखवणे सुरु केले आहे.
महादुला नगरपंचायत चा स्थानिक आमदाराने सर्वागिण विकास केला असता व भ्रष्टाचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली असती तर घरोघरी चहापाण्याला जाण्याची आज गरज नसती अशीही जनमानसात चर्चा सुरू आहे.

