श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
कामठी /नागपुर : 22 मे 2025
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने काल दिनांक 21/05/2025 रोज बुधवाई ला ठीक 5:00 वाजता कामठी येथे”जय हिंद ” यात्रा काढण्यात आली.
“याद करो कुर्बानी ” आणि ” जय हिंद ” च्या संकल्पनेवर सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा उर्फ यशवंत आष्टणकर हे होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने सुरेश भोयर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रसन्ना तिडके, माजी आमदार एस. क्यु. जामा,माजी जि.प.सदस्य नानाभाऊ कम्भाले , रमेश दुबे,नीरज यादव,शकूर नागानी, शंकरराव चाहंदे, किशोर मिरे,प्रकाश कोकाटे, अनंत वाघ, दयारामजी भोयर, राहुल घरडे, दिशाताई चंद्रिकापुरे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर जय हिंद यात्रा काढण्यात आली.
जय हिंद यात्रेची सुरुवात शहर काँग्रेस कमिटी च्या कार्यालयातून भारतरत्न व माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
जय हिंद यात्रेच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.राजेंद्र प्रसाद, शहीद स्मारक, व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करून पहलगाम मध्ये आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेले भारतीय नागरिक तसेच भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले भारतीय जवान यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांनी सभेला संबोधित केले.कामठी येथील नगर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात यात्रेचा समारोप करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी खालील प्रमाणे प्रामुख्याने उपस्थित होते.

सतीश आढावु, राजेश यादव,लक्ष्मण संगेवार, भीमरावजी लोखंडे, नितेश यादव, नरेंद्र गजभिये, सुरय्या बानो, उबेद अफरोज, आसिफ खान, अशोक गडलिंगे, निखिल कोकाटे, शशिकला देशमुख मंजू ताई मेश्राम अंबिका रामटेके संदीप जैन, फैजल नागानी सोयल अंजुम, अब्दुल सलाम, कृष्णाजी यादव, डॉ.सुनील वाघमारे चेतना गोडबोले, डॉ. इरफान, नगमा बेगम, ममता कांबळे, राजेश कांबळे, सोमेश जेटली, रितेश यादव, तुषार दवानी, फारूक कुरेशी, विभा मेश्राम, इत्यादी उपस्थित होते.
