श्री.सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 14 डिसेंबर 2025
नागपुरात यावर्षी 7 दिवसांचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शेकडो प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल पोर्टल मीडियातील पत्रकार व कैमेरामन यांची जेवणाची तारांबळ होऊ नये.मीडियाचे पत्रकार दिवसरात्र नागपूर अधिवेशनात राज्याच्या विविध भागातील प्रश्न, विदर्भाचे प्रलंबित प्रश्न यांवर मंत्रीमंडळाचे कामकाज, मंत्र्यांच्या पत्रपरिषद कव्हर करीत असतात. परंतु त्यांच्यासाठी एकवेळचे स्वादिष्ट गरमागरम भोजनाची व्यवस्था सन 2014 पासुन नागपुरात तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या माध्यमातून केली जाते. यांवर तर खरे पाहता मीडिया च्या माध्यमातून चर्चा व धन्यवाद होणे अपेक्षित आहे.
मध्यंतरी महसुलमंत्री बावनकुळे यांच्या एका विधानाची चर्चा राज्यात रंगली होती. ते एका कार्यकर्ता संवादात म्हणाले होते, की आपल्या भागात छोटेछोटे काही टिल्लू पंप (छोटे न्युज पोर्टल चैनल) असतात..त्यांच्याकडे आपल्या पदाधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे. आठवड्यातून एकदा दोनदा त्यांना ढाब्यावरचे जेवण चारा, त्यांची सर्व सोय घ्या, आपण केलेले चांगले काम त्यांना पटवून द्या, आपल्याबद्दल ते चांगले लिहितील.. या विधानावरून राज्यात खमंग चर्चा रंगली होती. की पत्रकार खरोखर जेवणावर टप्पुन असतात काय? त्यांनी राजकारण्यांकडून जेवण का घ्यावे. परंतु पत्रकार म्हटल्यावर तो निष्पक्ष, निर्भीड असला पाहिजे. सत्तेत कोणीही असो त्याविरुद्ध लिहिण्याची धमक असलीच पाहिजे
प्रशासनाला तो आरसा असला पाहिजे. चुकीच्या कामाला लपवु नये, सत्य शोधुन काढले पाहिजे. सामान्य, पीडितांना न्याय देण्यासाठी त्याची लेखणी झिझली पाहिजे.

परंतु त्याचबरोबर प्रामाणिक कार्य करणाऱ्या पत्रकारांना मानसन्मान प्रोत्साहन देण्यासाठी एखादा जनप्रतिनिधी मंत्री जर त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना उत्क्रृष्ट गर्मागरम भोजनची व्यवस्था करीत असेल तर त्याची मीडिया ने प्रशंसा करणे अपेक्षित आहे. ज्याचे खावे त्याला जगावे या म्हणीला सार्थक ठरवताना विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या पद्धतीने सातत्याने दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत शाकाहारी व मांसाहारी भोजनव्यवस्था केली होती. ही तारिफेकाबिल आहे यात काही वाद नाही. नागपुर विधानभवनाच्या मागे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पेंडाल टाकला होता. तिथे संपुर्ण मीडियातील पत्रकार, संपादक, फोटोग्राफर, व्हिडिओ जर्नलिस्ट यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर त्याठिकाणी सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोणताही पत्रकार उपाशी जाऊ नये यासाठी सुत्रबद्ध पद्धतीने रांगा लाऊन आतमधे जेवणासाठी सोडणारे महसुलमंत्री बावनकुळे यांचे खास मीडियातील कर्मचारी सुभाष भात्रा सर, विवेक जोशी, राजेश गोल्हर, संजय डाफ यांचे नियोजन वाखाणण्याजोगे दिसले.
एकंदरीत संपुर्ण अधिवेशनात महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या ढाब्यावरच्या स्वादिष्ट जेवणाचीच हवा दिसुन आली हे मात्र खरे!




































