श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS DIGITAL WEB PORTAL ONLINE
कोराडी /नागपुर 15 डिसेंबर 2025. नागपुर जिल्ह्यातील कोराडी 660 MW वीज प्रकल्पातील युनिट क्र. 9 मधील साईटवर विषारी वायुगळती वे जवळपास 10-12 कामगार गंभीर अवस्थेत असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 12-1 च्या दरम्यान मे. ई. एम सर्विसेस च्या चे युनिट क्र. 9 मध्ये टेंडर सुरु असुन या कंपनीचे जवळपास 10-12 कंत्राटी कामगार यांना विषारी वायुगळती मुळे श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. याची महाजेनको प्रशासनाला माहिती मिळतात सेफ्टी आँफिसर यांनी साइटवरील या सर्व कामगारांना कोराडी महाजेनको च्या विद्युत विहार परिसरातील प्राथमिक उपचार केंद्रात त्वरित उपचारासाठी दाखल केले असल्याचे समजते. परंतु नेमका कोणता विषारी वायुगळती झाली आणि वायुगळती चे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु कुठेतरी सेफ्टी प्रिकाँशन घेण्यास ई एम. सर्विसेस अपयशी ठरल्याची कामगारांत चर्चा सुरू आहे. महाजेनको प्रशासन यांवर नेमकी चौकशी कमेटी स्थापन करुन दोषी अधिकारी संबधित कंत्राटदार कंपनी तील जे कोणी दोषी असतील त्यांवर कारवाई करतील अशी आशा आहे. तसेच घटनेतील पीडित कामगारांवर अतितातकाळ उपचार करतील अशी आशा आहे.
आम्ही ई. एम. सर्विसेस कंपनीचे संबधित मैनैजर इर्शाद यांचेशी संपर्क केला असता त्यांचेही संपर्क होऊ शकला नाही. आम्ही लवकरच त्यांचे शी संपर्क साधुन घटनेची विस्त्रुत माहिती घेण्याचा प्रयत्न करु व


































