श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
महादुला कोराडी /नागपूर : 13 मे 2025
वैशाख पोर्णिमा च्या पावन पर्वावर महादुला नगरपंचायत येथील अनागरिक धम्माल बौद्ध विहार येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोह समिती तसेच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या संयुक्त विद्यमाने “बुद्ध पहाट” भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम काल घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता झाली. सर्वप्रथम मानवतावादी, समता, आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर कोराडी परिसरातील सुप्रसिद्ध “स्वरनील” म्युजिकल ग्रुपतर्फे संचालक गायक निलेश सावरकर, गायिका रक्षंदा व त्यांच्या इतर सहगायकांनी पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे,प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा, ओम नमो तथागता, नमोस्तु गौतमा… क्रांतीसुर्य तु इस जगत का.. भीमराव महान, कुंकु लाविले रमानं, घर घरते बाई जातं.. पहाटेच्या पारी.. यासारखी एकापरस एक सुप्रसिद्ध भीमबुद्ध गीतांचा मनमुराद आनंद आंबेडकरी अनुयायांनी घेतला.



याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते इशांत मानवटकर यांनी केले. यावेळी महादुला-कोराडी येथे आंबेडकरी चळवळीसाठी सक्रीय योगदान देणारे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांचा महामाया महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेश गजघाटे, रक्षित नितनवरे, सोनु सोनारे, विनित मेंढे, अभिषेक बन्सोड, प्रतिक पखिड्डे, निखिल गवांदे, क्षितिज पखिड्डे,प्रविण उगले, सार्थक आवळे, उपासिका आम्रपाली सोनारे, पुनम पखिड्डे, अर्चना मंडपे (माजी नगरसेविका), प्रिती गजघाटे, प्रगती पखिड्डे, रक्षा मंडपे, कुंदा मानवटकर, अश्विनी नितनवरे, उज्ज्वला गोंडोके, ट्विंकल पखिड्डे, महामाया महिला मंडळाच्या रख्माताई नानवटकर, रेखा ताई नितनवरे अंजनाबाई पाटील देवक्रृपा मानवटकर, बेबीबाई मानवटकर, सूजाताई पाटील, मायाताई मानवटकर इंदुबाई चिंचखेडे, चंद्रकला चोखोंद्रे आदींनी अथक परिश्रम घेतले.
