श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
नागपुर: 13 मे 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. 10 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 94.10% लागला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकाल नोंदवला असून नागपूर विभाग सर्वात मागे आहे. एकूणच, 15,58,020 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 93.04% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावी बोर्डाचा निकाल बघण्यासाठी दिलेल्या link होत नाही ओपन
दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? यासाठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी यांचेसाठी मोबाईलवर पाहावे असे बोर्डाच्या वतीने जाहीर केले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक वेबसाईटवर खालील लिंक जारी केल्या होत्या.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
या काही वेबसाइट आहेत. परंतु या लिंक अजुनही अपडेट केलेल्या नसल्याने तसेच सर्वर डाऊन असल्याने विद्यार्थी हवालदार झाले आहे त्यांना आँलाईन निकाल बघता येत नाही. दहावी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल बघण्यासाठी विद्यार्थी /पालक /शिक्षक हे दुपारी 1 वाजेपासून आतुर आहेत. परंतु शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या एकुण 5 ही वेबसाईट लिंक ओपन होत नाही. निकाल लागुन ही अर्धा तास झाला तरी अजुनही शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार संपेना. अजुनही विद्यार्थी निकाल बघण्यासाठी आतुर आहेत. आणि बोर्डाने दिलेल्या खालील 5 ही वेबसाईट लिंक ओपन होत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे निकालासाठी विलंब होण्याच्या कारणाचा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी छडा लावला पाहिजे.
@dadabhuse
@cmo
@Dev_Fadnavis
