श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नाशिक: 17 डिसेंबर 2025
राज्याचे क्रृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळाप्रकरणात न्यायालयाकडून दोन वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याविरोधात कोकाटेंनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. परंतु वरिष्ठ न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली व कोकाटेंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे नाँट रिचेबध असल्याचे समजते.
माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. परंतु, न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटून आपली बाजू मांडणार होते. मात्र, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांना पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माणिकराव कोकाटे यांचे अटक वॉरंट निघाल्यास अजित पवार त्यामध्ये हस्तक्षेप करुन मार्ग काढणार का, हे आता पाहावे लागेल. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून याविरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाऊन अटक वॉरंटला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात.हायकोर्टाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिल्यास कोकाटेंचे मंत्रीपद वाचु शकते.


































