आदर्श आचारसंहिताचे सर्रास उल्लंघन,निवडणुक आयोगाचे भरारी पथक, पोलीस यंत्रणा गाफील
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
महादुला-कोराडी /नागपुर : 1 डिसेंबर 2025. नगरपंचायत निवडणुक 2025 साठी एकीकडे आज रात्री 10 वाजेपर्यंत चा प्रचाराची अवधी वाढविण्यात आली आहे.आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
परंतु आज रात्री 8 वाजता पासुन महादुला नगरपंचायत परिसरात विविध झोपडपट्टी परिसरात सर्रास मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.
निवडणुक आयोगाने निष्पक्षपाती निवडणुका होण्यासाठी आदर्श आचारसंहिताचे सर्व राजकीय पक्षांना सुचना दिल्या आहेत. निवडणुक दरम्यान मतखरेदी होऊ नये, त्यामुळे एखाद्या गरीब होतकरु उमेदवार जो निवडुन येऊ शकतो.. अशा उमेदवाराचे नुकसान होऊ शकते म्हणून निवडणूक आयोगाने अशा मतखरेदी, दारु व पैशांचे वाटप थांबविण्यासाठी भरारी पथक नेमले आहे. परंतु भरारी पथक नेमकी कुठे भरारी घेत आहे, की स्वतः भरारी पथक कोमात गेले हे पता लागत नाही.
महादुला येथे हवाला ची मोठी रक्कम झोपडपट्टी मध्ये आल्याची चर्चा सुरू आहे. मतदारांना प्रलोभन दाखवून त्यांचे मत खरेदी करण्यासाठी 3 ते 5 हजार रुपये प्रति मतदार अशा प्रमाणे प्रत्येक घरी लिफाफे वाटप सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धार्थ नगर, फुले नगर, इंदिरा प्रगती नगर, जवाहरनगर, कौव्वापारा, रमाई नगर, जयभीम नगर, आदर्श नगर, आंबेडकर नगर श्रीवासनगर मध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप होणे हे आदर्श निवडणुकीसाठी घातक ठरत आहे.
अशावेळी भरारी पथक पोलीस प्रशासन गाफील का आहे? हे समजत नाही. पोलिसांची गश्त, पेट्रोलिंग कुठेही होतांना दिसत नाही. त्यामुळे निवडणुक आयोग सपशेल फेल ठरला आहे महादुला नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान.. असेच म्हणावे लागेल.


































