श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 4 डिसेंबर 2025
कामठी नगर परिषद निवडणुकीत (दि. 2 डिसेंबर) मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप बरिएमं च्या संस्थापिका अध्यक्षा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी 2 दिवसांपुर्वी प्रसारमाध्यम व सोशल मीडिया तुन केला होता. भाजप चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्यासाठी भाजपने सर्व यंत्रणा धाब्यावर बसवून बोगस मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले. तसेच कामठीच्या मध्यभागी असलेल्या अग्रवाल भवन व सुनील अग्रवाल यांचे S Farms मध्ये कामठी बाहेरुन आणलेले बोगस मतदार, चार चाकी वाहन, हातमोजे बोटांची शाई मिटवणारे लिक्विड (द्रव्य), तसेच मोठय़ा प्रमाणात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल्स अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर मारलेल्या छाप्यात मिळाले.



यावेळी निवडणुक अधिकारी कामठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळे व बरिएमं नेत्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे उपस्थित होते.
यावेळी भाजपकडून लोकशाहीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा बरिएमं चा आरोप असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या बोगस मतदानास प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनात आले आहे.असे माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी आरोप केला होता.
या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून बावनकुळे यांनी तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे करण्यात आली आहे.
तसेच या संदर्भातील सर्व तथ्यांसह खुलासा करण्यासाठी आज दि. 4 डिसेंबर, गुरुवार दुपारी 4.30 वाजता, प्रेस क्लब नागपूर येथे ॲड. सुलेखाताई कुंभारे यांची पत्रपरिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रपरिषदेला नागपुरातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया च्या सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहावे व पत्रपरिषद कव्हर करावी अशी विनंती वंदना भगत, नागपूर शहर अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांनी केली आहे.




































