श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी – नागपुर : 6 डिसेंबर 2025
आज महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देत हजारो आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, कामठी. कामठी येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रातील बाबासाहेबांच्या पुर्णाक्रृती पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामुहिक बुद्धवंदना करीत जब तक सुरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा च्या घोषणा देत आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक झाले. यावेळी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख, बरिएमं नेत्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे व बरिएमं चे अजय कदम, दिपांकर गणवीर, उदास बंसोड, दिपक सिरिया, चंदु लांजेवार, अंकुश बोंबर्डे, अनुभव पाटील, सुभाष सोमकुंवर, विलास बंसोड, सागर भावे, महेश सोमकुंवर, अविनाश वासे, नागसेन सुखदेवे, आकाश बोकरे, सुरज गडपाल, विनय बोंबर्डे, अमित पाटील, रोहित फुले , महेश तांबे, सुवर्णा सूखदेवे रेखा भावे, रजनी लिंगायत, सुकेशिनी मुरारकर, संगिता अग्रवाल, अमरिन फातिमा आदींनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

जयस्तंभ चौक, कामठी
तर कामठीतील जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन शेकडो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी बरिएमं नेत्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
संविधान चौक, नागपुर.

नागपुरातील संविधान चौकात बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकडो बरिएमं कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
बाबु हरदास एल. एन. चौक (बसस्टैंड) कामठी
कामठी येथील बाबु हरदास एल. एन. चौकात काल रात्री भीम स्म्रृती मंडळाच्या 58 व्या वर्धापन दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विदर्भाची बुलंद आवाज, युवा प्रबोधनकार विकास राजा यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनात्मक विचारांवर आधारित संगितमय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले. भंते नागदिपांकर, अँड. सुलेखाताई कुंभारे तसेच कांग्रेस चे नेते सुरेश भोयर, अजय कदम, येरखेडा ग्रा पं. च्या माजी सरपंचा सरिताताई रंगारी, प्रमोद (गुड्डु मानवटकर) माजी उपाध्यक्ष नगरपरिषद कामठी, रंजना पानतावणे सामाजिक कार्यकर्त्या यांनी दीपप्रज्वलन केले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


कार्यक्रमांचे आयोजन भीम स्म्रृती मंडळाचे नागसेन सुखदेवे, राजन मेश्राम, सुमित गेडाम, दिपांकर गणविर, रोहित महिले भिख्खु मेंढे, एस. एस. सहारे, अशोक नगरकर, महेंद्र कापसे, राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे,सुनील चव्हाण, डी. सी. चहांदे, गोविंद वासे,उमाकांत चिमणकर, सिद्धार्थ गेडाम यांनी केले होते.



































