श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
मुंबई : 9 मे 2025
भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवादी छावन्यांवर हल्ले केल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे.
भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना मोठा तडाखा दिला आहे. सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरुच आहे. पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान भारतभुमीचे रक्षण करतांना शहीद झाले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आलं आहे. भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी लढता लढता ते शहीद झाले.
