श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 18 आँक्टोबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी नगरपरिषद येथे कार्यरत संदीप बोरकर हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असुन 2021 पासुन नगरपरिषद अंतर्गत विविध वार्डात अण्णाभाऊ साठे दलित नागरी फंडातुन केलेल्या विकासकामात झालेल्या भ्रष्टाचारात ते सहभागी असल्याचा ठपका ठेवत नागपूर न्यायालयाने त्यांचेवर व त्यांचे सहकारी तत्कालीन माजी नगराध्यक्ष, माजी उपाध्यक्ष व माजी सभापती यांचेवर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
CO संदीप बोरकर यांना तात्पुरता जामीन जरी मिळाला असला तरी त्यांच्या अंतरिम जामिनावर आज नागपुर च्या सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. संदीप बोरकर यांची याआधीही कारकिर्द ही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्याचेवर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप लागले. तरी सुद्धा संदीप बोरकर यांना कामठी नगरपरिषद येथे आणण्याचा अट्टाहास कोणी केला? कुणाच्या इशाऱ्यावर कामठी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून बोरकर यांची बदली करण्यात आली? हा आता शोधाचा विषय आहे
कारण संदिप बोरकर जिथे कार्यरत असतात तेथील स्थानिक नगरपरिषद कमेटीला हाताशी धरून भ्रष्टाचार करतात असेही बोलले जाते, मग ते भाजपचे असो कि कॉग्रेस ची कमेटी सर्वांना भ्रष्टाचाराच्या रंगात डुबवुन टाकतात असेही बोलले जात आहे.

वणी नगरपरिषदेत ही बोरकर यांचे काळे कारनामे उघड, तिथेही कोर्टाच्या आदेशावरून त्यांचेवर गुन्हा दाखल
यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना संदीप बोरकर यांनी नियमाची अवहेलना करीत दोन प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यावेळी भाजप ची वणी नगरपरिषद मध्ये सत्ता होती. सन 2018 मध्ये मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी 3 मे 2018 सभा घेत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सभेत 2 अतिरिक्त विषय मांडत बेकायदेशीर रित्या मंजुरी दिली होती. या प्रकरणी मुख्याधिकारी बोरकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे सहित 24 भाजप नगरसेवक यांचेवर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन असे लक्षात येते कि भाजप च्या नेत्यांना. हाताशी धरून त्यांनी नियमबाह्य रित्या अनेक कामे केली. तसेच कामे न करता कंत्राटदारांची बिले सुद्धा काढली गेली.
सन 2017 मध्ये वणी येथील RTI कार्यकर्ता रविंद्र कांबळे यांनी माहिती अधिकारात रस्ते बांधकाम निविदा कंत्राटदार, सभेतील ठरावाची मागितलेली माहिती 30 दिवसाच्या आत न दिल्याने सातत्याने टाळाटाळ करण्याचा ठपका ठेवत मुख्याधिकारी संदीप बोरकर व इतर 2 अधिकाऱ्यांवर राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष संभाजी सुरकुंडे यांनी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला व वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याची शास्तीची कारवाई सुद्धा केली होती.
कामठी नगर परिषदेत कांग्रेस जरी सत्तेत असली तरी कॉग्रेस च्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांना हाताशी धरून मुख्याधिकारी बोरकर यांनी भ्रष्टाचार केले आणि सत्ताधारी पक्षाचा कार्यकाळ संपताच स्वतंत्र प्रशासकीय चार्ज घेऊन त्यांनी भाजपचे माजी पदाधिकारी व ठेकेदार यांना करोडो रुपयांची कंत्राटे वाटली.एकीकडे जनता पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, नालेसफाई अंतर्गत रस्ते निर्माण यावर करोडो रुपये खर्च करुन ही कामठीतील जनता विकासापासून वंचित राहिली. कामठी शहरातील झोपडपट्ट्या, डुकरांचा प्रादुर्भाव,मालकी हक्काचे पट्टे, आरोग्य उपाययोजना यांकडे नगरपरिषद चे झालेले दुर्लक्ष शहरात निर्माण झालेली पुरपरिस्थिती हाताळण्यात कामठी नगरपरिषद चे मुख्याधिकारी म्हणून बोरकर अपयशी ठरलेत. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली भीमसेना पैंथर, आझाद पार्टी व स्थानीय विविध राजकीय पक्षांनी कामठी नगरपदेवर मोर्चे सुद्धा काढले होते.
कामठी नगर परिषद मध्ये प्रशासकीय राजवटीतील सर्व विकासकामांची स्पेशल एसआयटी मार्फत चौकशी कयण्याची मागणी पुन्हा एकदा कांग्रेस चे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी केली आहे. त्यामुळे नेमका नगरपरिषद मध्ये केवढा घोटाळा झाला हे उघडकीस येऊ शकतो. आणि या घोटाळ्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? हे ही जनतेला समजेल.




































