श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी : 4 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील कोराडी पांजरा येथील वार्ड क्र. 1 मध्ये माँ अंबे उत्सव मंडळातर्फे दि 5 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर 2025 पर्यत श्रीमद भागवत कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध भागवत कथा वाचक हभप रमेशराव सावरकर (सावरगाव, नरखेड) हे कोराडी पांजरा येथे आयोजित कार्यक्रमात सात दिवस कथा प्रवचन करतील.

कोराडी पांजरा येथील संजय मांडवकर व रुख्माताई मांडवकर यांच्या प्रेरणेतून मां अंबे उत्सव मंडळाने श्रीमद भागवत कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे दि. 12 नोव्हेंबर 2025 ला आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा कोराडी जिल्हा परिषद सर्कल चे माजी सदस्य ज्ञानेश्वर ऊर्फ नानाभाऊ कंभाले हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कोराडी पांजरा गावातील युवकांत धार्मिक संस्कृती व संतमहात्म्यांचे विचार रुजावे या उद्देशाने मां अंबे उत्सव मंडळाचे अध्यक्ष चेतन मांडवकर, उपाध्यक्ष रामभाऊ गाडबैल, सचिव रोशन जाधव, सहसचिव रोहन मांडवकर कोषाध्यक्ष संजय महल्ले व त्यांचे सर्व सहकारी श्रीमद भागवत कथा प्रवचनाचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.


या कार्यक्रमांसाठी कोराडी येथील समाजसेवी माजी ग्रा. पं. सदस्य उमेश निमोने, माजी सदस्य अविनाश भोयर यांचेसह मनोज मानकर, भागवत पाटील, देवाजी भंडारी, पवन लाटकर, रमेश धोटे, दिपक माळवे, सचिन मानवटकर ई. मंडळी नियोजन व मार्गदर्शन करीत आहेत.

































