( VANSH NEWS Digital Web portal media online services)
नागपुर : 7 डिसेंबर 2025 महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंंनी संपुर्ण मीडियात मला कायदेशीर नोटीस पाठविल्याची बातमी पसरवली. परंतु मला अद्याप कोणतीही लिगल नोटीस मिळालेली नाही. महसुलमंत्री व नागपुर चे पालकमंत्री पदासारख्या सैद्धांतिक पदावर असलेल्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीने खोटी बातमी मीडिया त पसरवणे हे अशोभनीय असुन मी बावनकुळेंच्या या क्रृत्याचा जाहीर निषेध करते अशा स्पष्ट शब्दात माजी राज्यमंत्री तथा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या कि, मी बावनकुळेंच्या कायदेशीर नोटीस ची वाट बघत आहे. मला नोटीस मिळाल्यास मी नोटीस चे कायदेशीर भाषेत चोख उत्तर देणार. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसैनिक आहोत. आम्ही लढायला भीत नाही. आम्ही ताकदीने लढाई लढणार आणि आम्ही लढाई जिंकणार असा ठाम विश्वास माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केला. मीडिया तुन मला माफी माघा अन्यथा कायदेशीर लढाई ला तयार राहा अशी धमकी बावनकुळेंनी दिली आहे. परंतु मी बावनकुळेंना स्पष्ट शब्दात सांगते, मी माझ्या शब्दावर ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी माफी मागणार नाही. माझी लढाई कामठी नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून मतचोरीसाठी झालेल्या गंभीर प्रकारांवर प्रश्न उचलले. मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर करुन अग्रवाल भवन आणि S Farms वर घडलेल्या गैरकायदेशीर प्रकाराने निवडणुक आयोगाने ठरवुन दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे भाजप उमेदवारांकडून थेट उल्लंघन केले असल्याने त्याविरुद्ध आवाज उचलायचा आम्हाला लोकशाहीत अधिकार आहे. आणि भाजप उमेदवारांच्या या क्रृत्याविषयी त्याची कानउघाडणी न करता त्याचेवर कोणताही FIR दाखल न करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग भाजप नेत्यांकडुन झाला याविरोधात बावनकुळे कधी बोलणार? S Farms वर मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, भाजप उमेदवार अग्रवाल यांचा पुतण्या, बोगस मतदार, बोटाची शाई मिटवणारे लिक्विड (द्रव्य) घटनास्थळी निवडणुक अधिकारी व पोलीस प्रशासनाने जप्त केले हा प्रकार जर बावनकुळेंना मान्य असेल तर आम्ही समजु की या मतचोरीला बावनकुळेंचे राजकीय संरक्षण आहे असेही अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पुण्यातील महारवतनाच्या जमिनी चा झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार हे मुख्य आरोपी आहेत. कारण पार्थ अजित पवार यांच्याकडे कंपनीचे 99% शेअर्स असतांना ही त्यांचे FIR मध्ये नाव नाही तसेच त्याला अटक सुद्धा झाली नाही पार्थ पवारांचा हा घोटाळा महसुल खात्यांतर्गत झालेला आहे. बावनकुळे महसुलमंत्री आहेत.. बावनकुळेंच्या महसुल खात्यांतर्गत हा एवढा मोठा घोटाळा झालेला असुन या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करुन यातुन पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यामुळे मी बोललेल्या शब्दावर कायम आहे. या जमीनघोटाळ्याला बावनकुळे हे स्वतः जिम्मेदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळें चा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी सुद्धा मागणी माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी या निवेदनात केली.


































