Vansh News Digital Web portal online service
मौदा /नागपुर : 7 डिसेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील मौजा चाचेर येथे अजब प्रकार घडत आहे.शासकीय मालमत्ता, विदयुत चोरी,महसूल विभागाची रेती चोरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 12/11/2025 ला विद्युत भरारी पथक यांनी चाचेर गावांमध्ये विद्युत चोरी पकडून धाडी टाकण्यात आले. सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री यांचे अत्यंत विश्वासू पात्र असल्याचे धर्मराज बावनकुळे है सांगतात. ते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी शाखा चाचेर चे अध्यक्ष, मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते असुन यांच्याकडे महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने तिसऱ्यांदा विदयुत चोरी पकडली. मे 2023 त्यांच्या कडे पहिल्यांदा चोरी पकडण्यात आली. त्यामध्ये एक लक्ष 33 हजार रुपये दंड आकारण्यात आला.परंतु कारवाई झाल्याच्या नंतरही त्यांची विद्युत चोरी ही थांबलेली नाही. ते वारंवार विद्युत चोरी करत असल्याचा त्यांचेवर आरोप आहे.दि. 12/11/2025 या तारखेला त्यांची विद्युत चोरी पकडण्यात आली. सब डिविजन रामटेक यांनी धर्मराज बावनकुळे यांना 1 लाख 57,689 दंड आकारला अशी माहिती रामटेक उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. बावनकुळेंच्यज वीजचोरीमुळे शासनाच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे .



तसेच सांड नाल्यातून रेती चोरी करणे नेहमी सुरु असते. या प्रकरणात धर्मराज बावनकुळे परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी शाखा चाचेरचे अध्यक्ष, मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते यांचे पुत्र रोशन धर्मराज बावनकुळे यांच्या वर रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ मोठे गुन्हे नोंद झाले आहे.मोठ्या प्रमाणामध्ये सांड नाल्यातून रेती चोरीचे प्रकार सुरु असतात. त्यांच्यावर रामटेक पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आले आहे.त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तरीसुद्धा त्यांचे चोरीचे प्रकार थांबलेले नाही. या ठिकाणी असा प्रकार दिसतो की लोकांना सांगे ब्रह्म ज्ञान,स्वतः कोरडे पाषाण.. अशी अवस्था त्यांची आहे.स्वतःचोरी करायची आणि दुसऱ्याला ज्ञान वाटायचे.
संपूर्ण परिसरात धर्मराज बावनकुळे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी शाखा चाचेर, मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते हे (अध्यक्ष )पद या मार्गाला कलंकित करणारे वाटत आहे. चोरी प्रकरणामुळे गावातील व परिसरातील सेवकांमध्ये संदेश चुकीचा जात असून संभ्रम निर्माण होऊ लागलं आहे.परंतु हे स्वतःच त्या कामात अनेक वर्षांपासून रंगलेले आहेत.म्हणून अशा लोकांवरती शासनानी कडक कारवाई करण्यात यावी.व परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी यांनी मार्गाची दिशाभूल, करून मार्गाला कलंकित करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करून त्यांचे पद रिक्त करावे अशी समस्त परमात्मा सेवकांची मागणी आहे.



































