श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital media services
नागपुर : 21 जुन 2025
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भर्ती घोटाळ्याची प्रामाणिक चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकातील कर्तव्यदक्ष एसिपी सुनीता मेश्राम यांची काल अचानक उचलबांगडी केल्याने आता एसआयटी च्या रडारवर असलेल्या अनेक संस्थाचालक यांना बहूतेक दिलास देण्याचा डाव तर नाही ना अशी शंका आता जनतेला वाटत आहे.
एसीपी सुनिता मेश्राम यांनी आतापर्यंत बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात 18 च्या आसपास आरोपींना अटक केली होती. यांत चरण चेटूले व भाजप चे दिलीप धोटे या संस्थाचालकांस अटक झाल्यानंतर अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले होते. शिक्षण उपसंचालक व वेतन अधिक्षक यांच्या वर गुन्हे दाखल झाल्यानंतर या सर्वांनी अटकपूर्व जामीनाचा प्रयत्न त्यांचा सुरु होता परंतु उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांना अटक निश्चित होती. या प्रकरणात आणखी काही भाजप नेते व संस्थाचालक अडकण्याची भीती होती.
दिलीप धोटे हा भाजप चा माजी पं. स. सदस्य होता तसेच तो भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आरएसएस च्या संघपार्श्वभुमीचा कार्यकर्ता असल्याने भाजप ची गोची झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्ते असलेले संस्थाचालक च बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात बसल्याने आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत गंभीर पराभव होऊ नये याच भीतीने Acp सुनिता मेश्राम यांची या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाथुन उचलबांगडी केल्याने आता बोगस शिक्षण भर्ती घोटाळ्याची चौकीवर निश्चित परिणाम होईल. या चौकशीतून एसीपी सुनिता मेश्राम यांना हटविण्यापाठीमागे राजकीय दबाव तर नाही ना असे आता जनतेला वाटते!
अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे की? काही संस्थाचालकांनी नागपुर पोलीस आयुक्त रविंद सिंगल यांची भेट घेतली होती. आता या भेटीमागे नेमके काय कारण होते हे त्यांनाच माहीत. आणा या प्रकरणाची चौकशी एसआयटी प्रमुख डीसीपी राहुल मदने करणार असल्याचे समजते. त्यांचे कडुन निष्पक्ष चौकशी होईल अशी फक्त आपण आशा करु शकतो… कारण नागपुरातील आँडी अपघात प्रकरणात त्यांचेखडुन चौकशी संशयाच्या भोवऱ्यात होती.. या चौकीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उचलले होते हे विशेष.
