श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital media services
नागपुर : 18 जुन 2025
महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित “शालार्थ आयडी’ घोटाळ्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भर्ती करणाऱ्या संस्थाचालकांवर एसआयटी ची कडक नजर असुन त्याचेवर फौजदारी कारवाईला सुरुवात झाली आहे.खरे बघता या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार संदीप जोशी यांनी केली. आता याच घोटाळ्यात भाजप नेतेच आरोपी निघत आहेत.नागपुरात पहिली मोठी कारवाई झाली कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील RSS व भाजप शी 1992 पासुन जुळलेले भाजप नेते दिलीप धोटे यांचेवर. दिलीप धोटेंच्या विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेच्या 15 शिक्षकांच्या बोगस शालार्थ आयडी बनवुन प्रत्येकाकडून 15 लाख रुपये घेऊन करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा धोटेंवर गंभीर आरोप आहे. भंडारा जिल्ह्य़ातील चरण चेटुले यांना याआधीच अटक झाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती भंडारा. गोंदिया गडचिरोली नागपुर पासुन तर राज्यभर वाढली असुन यांत केवळ शिठण विभागाचे अधिकारी, शिक्षक च जबरदस्त नसुन संस्थाचालक राजकीय नेते सुद्धा या घोटाळ्यात गुंतले असण्याचा आरोप आ. संदीप जोशी यांनी केला आहे. या प्रकरणात आणखी एक भाजप नेत्यांचे कनेक्शन उघड झाले आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले नागपुर शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक असलेले सतिश मेंढे हे अद्याप फरार आहेत. सतिश मेंढे हे भाजप चे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ आहे. आरोपी सतिश मेंढे हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत आहेत हे विशेष! त्यामुळे या घोटाळ्यावर भाजप नेते सध्या बैकफुट वर आले असुन ते यांवर बोलायला घाबरत आहेत. आजपर्यंत आपण ऐकत होतो सर्व शिक्षण संस्थां कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. परंतु आता शिक्षक भर्ती घोटाळा पुढे येताच या घोटाळ्यात भाजप नेते ही सहभागी असल्याने शिक्षण क्षेत्रातील मोठ्या घोटाळ्यात भाजप ही आता मागे राहिली नाही हे निष्पन्न झाले.
याप्रकरणी 2700 शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांची यादी तयार असून 700 च्या वर शिक्षकांचे बनावट रेकाॅर्ड गहाळ असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.








बनावट शालार्थ आयडी बनवुन शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी प्रमुख आरोपी, वेतन अधिक्षक निलेश वाघमारे हा मागील दीड महिन्यापासून फरार आहे. त्याची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्याच्यावर दबाव वाढत आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढली आहे.
निलेश वाघमारेची पत्नी मेघा ही नायब तहसीलदार असुन निलेश च्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांचीही पोलीस प्रशासनाने चौकशी केली आहे. निलेश वाघमारे ची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाने वाघमारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तत्पूर्वीच त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार दिला असून शिक्षण विभागाने त्याला अतितात्काळ निलंबित केले आहे सांगितले जात आहे की, निलेश वाघमारे त्याच्याशी संबंधितांशी व्हाॅट्सॲप काॅलिंगवर संपर्क साधत आहे. त्याचे काही मित्र त्याला नवनवीन सिमकार्ड त्याला पुरवत आहेत. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होण्यास वेळ लागत आहे. मात्र पोलिस लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल अशी सुत्रांनी माहिती दिली.


