श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
औरंगाबाद : 3 मे 2025
महाराष्ट्रातील मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि वंचित समाजाच्या हक्काच्या सामाजिक न्याय विभागाच्या 410 कोटी रुपये लाडकी बहिण योजना नावाच्या योजनेसाठी वळवण्यात आलेता असुन ! हा थेट सामाजिक न्यायावर घाला असल्याचा आरोप आँल इंडिया पैंथर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा राज्य प्रवक्ता भाई बंटी सदाशिवे यांनी नुकताच केला आहे.
ते पुढे म्हणाले की, हा पैसा होता गरिबांच्या घरकुलासाठी, शिक्षणासाठी, आणि त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी! पण सरकारने हा निधी लुटून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरलाय! आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी तात्काळ परत करण्याची मागणी भाई बंटी सदाशिवे यांनी केली.



त्यांनी पुढे मागणी केली, घरकुल योजनेचा निधी सरसकट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा, कारण पावसाळा तोंडावर आहे आणि गरिबांना डोक्यावर छप्पर हवंय! सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणाऱ्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीवर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा अशीही त्यांनी मागणी केली.
हा इशारा आहे! जर हा निधी तात्काळ परत केला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करू! परिणाम गंभीर होतील! असा इशारा आँल इंडिया पैंथर सेनेचे राज्य प्रवक्ता व मराठवाडा अध्यक्ष भाई बंटी सदाशिवे यांनी राज्य सरकारला दिला आहे
#सामाजिकन्याय
#निधीपरतकरा #घरकुल #ऍट्रॉसिटीऍक्ट
#लाडलीबहिणनको #वंचितांचाआवाज
#AllindiaPantherSena
