श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
मुंबई : 3 मे 2025
एकीकडे महायुती सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहिणिंना 2100/- रुपये देऊ असे खोटे आश्वासन देऊन सत्तेनल आलेल्या महायुती सरकार वर सध्या त्यांचे सहकारी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करीत आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे.
संजय शिरसाठ म्हणाले की, माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. यापूर्वीदेखील 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय.
या खात्याची आवश्यकता नसेल तर राज्य सरकारने हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं ते आम्ही बघून घेऊ अशा शब्दात त्यांनी संतापदेखील व्यक्त केला.
बहीणी 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत. त्यात त्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ताही अद्याप मिळाला नाहीय. हे सर्व सुरु असताना लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत धुसूफूस सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली
